ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

जंक फूडच्या काळात नगरच्या महिलांनी दाखवली कल्पकता:‘जय आनंद महावीर’तर्फे आयोजन, प्राची थिगळे यांच्या ‘ज्वारीच्या पौष्टिक धिरड्याला’ प्रथम क्रमांक‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रत्येक महिलेमध्ये उपजतच पाककलेचे गुण असतात. कुटुंबाला सकस, ताजे आणि पौष्टिक अन्न देण्यासाठी त्या स्वयंपाकघरात अतिशय आपुलकीने राबत असतात. सध्याच्या जंक फूडच्या काळात मुलांना शुद्ध शाकाहारी पौष्टिक टिफीन देण्यासाठी महिला मोठी कल्पकता दाखवत आहेत. त्यामुळे मुले घरचा डबा आनंदाने खातात,” असे प्रतिपादन सिमा राहुल मुनोत यांनी केले. नवी पेठ येथील ‘जय आनंद महावीर युवक मंडळा’च्या वतीने महिलांसाठी आयोजित ऑनलाईन पौष्टिक शाकाहारी टिफीन स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. या आगळ्यावेगळ्या स्पर्धेला नगरमधील महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत ज्वारीचे पौष्टिक धिरडे बनवून प्राची अमोल थिगळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. उषा नितीन शेठिया (मोरींगा स्क्वेअर्स) यांनी द्वितीय, तर शिल्पा पियुष मुथ्था (कडधान्याचे स्प्राऊड अप्पे) यांनी तृतीय क्रमांक मिळवला. शैला सोनसळे (बाजरीच्या पुऱ्या), वर्षा गुंदेचा (नाचणी व ज्वारीचे नूडल्स), सोनल तरटे (नाचणीचे लाडू) आणि कोमल पवार (ज्वारीचे घावण) यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत म्हणाले, मंडळ यंदा आपले रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत असून, या निमित्त वर्षभर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. ऑनलाईन पद्धतीमुळे महिलांचा येण्या-जाण्याचा वेळ वाचला आणि त्यांना घरबसल्या पाककौशल्य दाखवण्याचे मोठे व्यासपीठ मिळाले. याप्रसंगी परीक्षक राणी शरद मुथा, सेक्रेटरी आनंद मुथा, कार्याध्यक्ष सत्येन मुथा, प्रमोद गांधी आदी उपस्थित होते. जय आनंद महावीर युवक मंडळ आरोग्य शिबिरे, रक्तदान, अन्नदान, वंचित मुलांना मदत, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता अभियान यांसारखे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवते. यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष अधिक संस्मरणीय आणि व्यापक करण्याचा संकल्प सर्व सदस्यांनी सोडला आहे. विजेत्या महिलांनीही या उपक्रमाचे कौतुक करत अशा स्पर्धांमुळे नवीन रेसिपी शिकायला मिळतात, अशी भावना व्यक्त केली. आभार आनंद मुथा यांनी मानले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर