ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

रुपाली चाकणकर राजीनामा देणार का?:बलात्काराचा आरोप असलेल्या अशोक खरातचे केले पाद्यपूजन; राष्ट्रवादीसह अंजली दमानियांचा निशाणा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या व महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ज्योतिषी व तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेचे शोषण केल्याचा आरोप असलेल्या व अटक करण्यात आलेल्या भोंदूबाबा अशोक खरातची पाद्यपूजा रुपाली चाकणकर यांनी केली आहे. यावरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे. याचसह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील ट्विट करत चाकणकरांवर निशाणा साधला असून बलात्काराचे आरोप असणाऱ्या व्यक्तीचे महिला आयोगाच्या अध्यक्षा पाय धुतानाचे व्हिडिओ? असा सवाल उपस्थित करत टीका केली आहे. अशोक खरातची पाद्यपूजा करणाऱ्या रुपाली चाकणकरांनी आता राजीनामा द्यावा. त्यांना कोणत्याही पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असे शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेणार का? असा सवाल त्यांनी केला आहे. विकास लवांडे म्हणाले, अशोक खरातसारख्या सर्वच भ्रष्टाचारी लोकांना भाजपकडून अभय मिळत आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या अशोक खरातची पाद्यपूजा करताहेत, त्यांची सेवा करत आहेत. अशोक खरातसोबतचे रूपाली चाकणकरांचे फोटो पाहून खंत वाटते. आता तरी त्या राजीनामा देतील का? रुपाली चाकणकरांच्या अनेक चुका या गंभीर स्वरूपाच्या असून त्या आतापर्यंत दडपल्या आहेत. आता या घटनेनंतर तरी त्यांचा राजीनामा घेणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील रुपाली चाकणकर यांचे फोटो व व्हिडिओ ट्विटवर शेअर करत निशाणा साधला आहे. दमानिया म्हणाल्या, बलात्काराचे आरोप असणाऱ्या अशोक खरातांचे महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा यांचे पाय धुतानाचे व्हिडिओ? खूप वर्ष त्यांना ह्या ओळखतात? त्यांच्या संघटनेवर, त्यावर पदाचा पण उल्लेख आहे. ह्या माणसाची प्रचंड माहिती माझ्यापर्यंत येत आहे. लवकरच खुलासा करेन, असे दमानिया यांनी म्हटले आहे. अंजली दमानिया यांनी शेअर केलेल्या एका फोटोमध्ये अशोक खरातच्या संघटनेचे नाव आहे. श्री शिवनिका संस्थान, मिरगांव, असे नाव असून यात रुपाली चाकणकर यांचे नाव असून त्या नावापुढे सदस्या असे पद देखील लिहिले आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबाचे पाय धुणे अत्यंत लाजिरवाणे – विजय वडेट्टीवार कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा, महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावर राहण्याचा त्यांना अधिकार नाही! महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी अशोक खरातसारख्या महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबाचे पाय धुणे अत्यंत लाजिरवाणे आहे. महिलांवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीचे पूजन करणाऱ्या अध्यक्षांकडून राज्यातील महिलाना न्याय मिळणार कसा? त्यामुळे रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून राजीनामा द्यावा त्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही! एकीकडे महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वतःला पुरोगामी म्हणवून घेतात, इतर महिलांना संविधान वाचण्याचे उपदेश देतात. दुसरीकडे भोंदू बाबाचे पाय धुतात हेच का यांचे पुरोगामीत्व? हीच का यांची संविधानावरील श्रद्धा? असा संतप्त सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. अजितदादांच्या पक्षाची पुरोगामी प्रतिमा दादांसोबतच गेली- रोहित पवार रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले, आपल्याला जेलची हवा खावी लागेल हे स्वतःचं भविष्य ज्या ज्योतिषाला कळलं नाही तो नाशिकचा तथाकथित राजकीय ज्योतिषी आणि बलात्काराच्या आरोपाखाली अटक आरोपी अशोक खरात हे प्रकरण खूपच भयंकर दिसतंय… त्याच्या राजकीय क्लायंटची नावं पाहिली तर अजितदादांच्या पक्षाची पुरोगामी प्रतिमा दादांसोबतच गेल्याचं दिसतंय.. कारण आता जे उरलं ते महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय…! राहिला प्रश्न इतर पक्षाच्या नेत्यांचा.. तर पुरोगामित्वाचा आणि त्यांचा कधी संबंधच नव्हता. पण आता बाहेर आलेले व्हिडिओ बघता त्या बलात्कारी भोंदू ज्योतिषाने या नेत्यांना कोणता ‘मंत्र’ दिला असेल हे त्यांचं त्यांनाच माहीत..! आरोपांबाबत मला कल्पना नाही- रुपाली चाकणकर रुपाली चाकणकर यांच्यावर झालेल्या आरोपांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, कॅप्टन खरातांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही. आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलिस निष्पक्षपणे चौकशी करतील. पोलिस तपासावर आपला पूर्ण विश्वास आहे, असे चाकणकर यांनी म्हटले आहे. अशोक खरातचे नेमके प्रकरण काय? अशोक खरातच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. अशोक खरातने एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 18 मार्च रोजी त्याला पहाटे 3 वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. अशोक खरात हा निवृत्त मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झाला आहे. काही वर्षांपासून त्याला अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. अनेक मोठे नेते तसेच कलाकार मंडळी देखील त्याच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी जात असतात. मात्र, आता त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर