ब्रेकिंग न्यूज
पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…
SP News Maregaon

धाराशिव-लातूर-बीड विधानपरिषद:भाजपच्या बसवराज पाटलांसमोर काँग्रेसच्या महेश देशमुखांचे आव्हान; आज अर्ज भरणार

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही प्रमुख आघाड्यांनी आपापले उमेदवार जाहीर केले असून, भाजप-महायुतीने माजी राज्यमंत्री व लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकर यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस-महाविकास आघाडीने युवा नेते आणि जिल्हा परिषद सदस्य महेश देशमुख यांच्यावर विश्वास टाकत त्यांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. यंदाच्या धाराशिव-लातूर-बीड या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी ज्येष्ठ विरुद्ध तरुण असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. तसेच हे दोन्ही उमेदवार उमरगा तालुक्याचे भूमिपुत्र आहेत. त्यामुळे ही लढत अत्यंत चुरशीची समजली जात असून संपूर्ण मराठवाडा तसेच राज्याचेही या निवडणुकीकडे लक्ष असणार आहे. आज या बसवराज पाटील मुरुमकर आणि महेश देशमुख हे धाराशिव जिल्हाधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी कीर्तीकुमार पुजार यांच्याकडे आपले नामनिर्देशनपत्र दाखल करणार आहेत. बसवराज पाटलांची सहकार क्षेत्रावर मजबूत पकड मराठवाड्यातील सहकार क्षेत्रावर मजबूत पकड आणि मुरुम येथील विठ्ठल साई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून स्थानिक पातळीवर मोठा प्रभाव असलेल्या माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांना भाजपने थेट विधानपरिषदेच्या रिंगणात उतरवले आहे. काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पाटील यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा घेण्याच्या उद्देशाने पक्षाने त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. महेश देशमुखांकडे भक्कम नेटवर्क दुसऱ्या बाजूला काँग्रेसने राहुल गांधी यांच्या कोअर टीमचा भाग मानले जाणारे, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व ओडिशाचे प्रभारी महेश देशमुख या तरुण आणि निष्ठावंत चेहऱ्याला संधी दिली आहे. धाराशिव जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य असल्यामुळे देशमुख यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांशी थेट संपर्क असून, पक्षाशी असलेली एकनिष्ठता आणि तरुण कार्यकर्त्यांचे भक्कम नेटवर्क ही त्यांच्या उमेदवारीची प्रमुख ताकद आहे. लढतीकडे सगळ्यांचे लक्ष धाराशिव, लातूर आणि बीड या तीन जिल्ह्यांतील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापतींसह पालिकांचे नगरसेवक मतदान करत असलेल्या या निवडणुकीत दोन्ही उमेदवार उमरग्याचे असले तरी, लातूर आणि बीडचे संख्याबळ व तेथील स्थानिक नेत्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. बसवराज पाटील यांच्या पक्षांतरामुळे काँग्रेससाठी प्रतिष्ठेची आणि भाजपसाठी वर्चस्व सिद्ध करण्याची ईर्ष्या बनलेल्या या निवडणुकीत, उमरग्याच्या दोन सुपुत्रांमधील हायव्होल्टेज लढतीमध्ये मतदार नेमका कोणाच्या बाजूने कौल देतात, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे डोळे लागले आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर