ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

वाढीव हद्दीतून ‘7/12’ हद्दपार होऊन ‘प्रॉपर्टी कार्ड’ मिळणार:ग्रामीण ओळख पुसली जाणार, राज्य शासनाचा मोठा निर्णय, संभाजीनगरसह सर्वच महापालिकांना फायदा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यातील शहरांचा विस्तार वेगाने होत असताना महापालिका आणि नगरपालिकांमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांची ‘ग्रामीण’ ओळख आता कागदोपत्रीही पुसली जाणार आहे. या वाढीव क्षेत्रांमधील जमिनींचे ७/१२ उतारे आता कायमचे इतिहासजमा होणार असून, त्याऐवजी अधिकृत ‘प्रॉपर्टी कार्ड’ (मिळकतपत्रिका) देण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुंबई, छत्रपती संभाजीनगर महापालिकेसह राज्यातील सर्वच वाढत्या शहरांना याचा मोठा फायदा होणार असून, मालमत्ताधारकांची मालकी हक्काच्या वादातून आणि प्रशासकीय कचाट्यातून कायमची सुटका होणार आहे. राज्यातील अनेक शहरांच्या हद्दीत कालांतराने आजूबाजूच्या गावांचा समावेश करण्यात आला. मात्र, या नवीन हद्दींचे नगर भूमापन (सिटी सर्व्हे) रखडल्याने आजही तेथील जमिनींचा व्यवहार किंवा नोंदणी ७/१२ उताऱ्यांवरच होत होती. सिटी सर्व्हे नंबरऐवजी जुनेच गट नंबर किंवा सर्वे नंबर अस्तित्वात असल्याने मालमत्ताधारकांना आपली निर्विवाद मालकी सिद्ध करताना अनेक कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागत होता. आता शासनाच्या नव्या निर्णयामुळे ही अडचण दूर होणार आहे. महसूल व वन विभागाने २६ मे २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे. अशी राबवली जाणार प्रक्रिया सिटी सर्व्हे होणार: महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ मधील तरतुदींनुसार या सर्व नव्या आणि वाढीव नागरी क्षेत्रांचे तातडीने नगर भूमापन (सिटी सर्व्हे) केले जाईल. प्रस्ताव आणि निधी संबंधित महापालिका वा नगरपालिकेला या सर्व्हेसाठी जिल्ह्याच्या भूमि अभिलेख अधीक्षकांकडे प्रस्ताव द्यावा लागेल. यासाठी लागणारा खर्च ‘जिल्हा वार्षिक निधी’ किंवा ‘नगरोत्थान योजने’तून उपलब्ध करून तो भूमि अभिलेख विभागाकडे जमा करणे बंधनकारक असेल. प्रत्यक्ष वाटप निधी प्राप्त होताच भूमि अभिलेख विभाग सिटी सर्व्हे पूर्ण करेल. त्यानंतर जुने ७/१२ उतारे पूर्णपणे बंद करून नागरिकांना अधिकृत मिळकतपत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) वितरित केल्या जातील. अतिक्रमित आणि शासकीय जमिनींचे काय? सिटी सर्व्हेदरम्यान शासकीय जमिनींवरील अतिक्रमणांचा प्रश्नही मार्गी लावला जाणार आहे. ज्या सरकारी जागेवर अतिक्रमण झाले आहे, तिथे महसूल विभागाच्या (२५ मार्च २०२६ च्या) निर्णयानुसार जिल्हाधिकारी योग्य ती कायदेशीर कारवाई करतील. त्यानंतरच मिळकतपत्रिका दिली जाईल. मात्र, ज्या शासकीय जमिनींवर कोणतेही अतिक्रमण नाही, अशा जागांची मिळकतपत्रिका थेट ‘महाराष्ट्र शासन’ या नावाने तयार केली जाईल. शासनाच्या या स्पष्ट धोरणामुळे नागरी भागातील जमिनींचे वाद मिटण्यास मोठी मदत मिळणार आहे. मालमत्ताधारकांत ‘प्रॉपर्टी कार्ड’ मानले जाते अधिक सुरक्षित ‘७/१२’ हा प्रामुख्याने शेतजमिनीचा महसुली दस्तऐवज असतो, ज्यामध्ये पिकांच्या आणि कर्जाच्या नोंदी असतात (गाव नमुना ७ आणि १२). तर ‘प्रॉपर्टी कार्ड’ (मिळकतपत्रिका) हा शहरी भागातील अकृषिक जमिनीच्या मालकीचा अंतिम कायदेशीर पुरावा असतो, ज्यावर शहराचा सिटी सर्व्हे (सीटीएस) क्रमांक नोंदवलेला असतो. शहराच्या हद्दीत घर किंवा जमीन खरेदी-विक्रीसाठी ‘७/१२’ ऐवजी ‘प्रॉपर्टी कार्ड’ अधिकृत आणि कायदेशीरदृष्ट्या जास्त सुरक्षित मानले जाते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर