ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

1 लाख 5 हजार ग्राहकांकडे स्मार्ट मीटर:शिवसेनेच्या शिंदे गटाचा एल्गार, ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया थांबवा‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे १ लाख ५ हजार घरगुती ग्राहकांकडे स्मार्ट मीटर लावण्यात आले आहेत. मात्र, स्मार्ट वीज मीटर बसवण्यासाठी महावितरण कंपनीकडून ग्राहकांना पाठवण्यात येत असलेल्या मेसेजचे सोमवारी तीव्र पडसाद उमटले. ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्टमीटर बसवण्याची प्रक्रिया थांबवा, यासह अन्य मागण्यांसाठी शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे महावितरणाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी घोषणा देत मागण्या लावून धरल्या. अधीक्षक अभियंत्यांना निवेदनही सादर केले. मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही शिवसेनेने दिला. महावितरण कंपनीकडून ग्राहकांना ‘४८ तास’ मुदतीत स्मार्ट मीटर लावून घेण्याबाबत मेसेज येत आहेत. ‘भारत सरकारने १७ ऑगस्ट २०२१ रोजी जारी केलेल्या राजपत्र अधिसूचनेनुसार, हा संदेश मिळाल्यापासून ४८ तासांनंतर तुमचे सध्याचे मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे, असे नमूद केले आहे. उर्वरित पान ४ जिल्ह्यात सुमारे ४ लाख ५० हजार घरगुती वीज ग्राहक आहेत. जिल्ह्यात काही दिवसांपासून ग्राहकांचे जुने मीटर बदलवून स्मार्ट (टाईम ऑफ द डे- टीओडी) मीटर लावण्यात येत आहे. आहे. जिल्ह्यातील जुन्या ८५ हजार ९५६ ग्राहकांकडे मीटर लावण्यात आले आहे. तसेच नवी वीज जोडणीसाठी १९ हजार ३१३ ग्राहकांकडे मीटर बसवण्यात आले आहेत. हे मीटर केवळ वापरलेल्या विजेचे अचूक मोजमाप करते, असे महावितरण कंपनीकडून दावा करण्यात आले आहे. या मीटरसाठी महावितरण कोणत्याही प्रकारचे शुल्क ग्राहकांकडून आकारत नाही, शिवाय हे मीटर बसवणे सर्वच ग्राहकांसाठी अनिवार्य असल्याचेही महावितरणने स्पष्ट केले आहे. केंद्र, राज्य व महापालिकेच्या सत्तेतही सहभागी झालेल्या शिंंदेच्या शिवसेनेकडून सरकारच्या निर्णयाविरोधात अकोल्यात आंदोलन करण्यात येत आहे. असे आंदोलन करण्याची ही पहिली वेळ नाही. सरकारी यंत्रणाविरोद्धच्या आंदोलनात भाजप त्या-त्या प्रशासनाची बाजू घेते. मात्र शिंदे गट मित्र पक्ष भाजपला कोंडीत पकडण्याची संधी सोडत नसल्याचे दिसून आले. मुळात शिंदे गटातील सध्याचे प्रमुख पदाधिकारी हे कधी काळी शिवसेनेच्या ठाकरे गटात व भाजपवासी होते. मात्र काही दिवसांपूर्वी ते शिंदे गटात आले. मित्र पक्ष शिवसेनेकडून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न मीटर लावणे अनिवार्य; महावितरणचा दावा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर