ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

“वर्क फ्रॉम होम’चा फायदा घेत सफरचंदाचा यशस्वी प्रयोग:मिरी येथील शाहरुख शेख यांच्या शेतात भर उन्हाळ्यात सफरचंदाची फळधारणा

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी | पाथर्डी “सफरचंद फक्त जम्मू-काश्मीरसारख्या थंड हवेच्या प्रदेशातच येते,” हा पारंपरिक गैरसमज पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील एका तरुण संगणक अभियंत्याने आपल्या यशस्वी प्रयोगातून दूर केला आहे. शाहरुख सादिक शेख (वय ३३) या प्रयोगशील आयटी इंजिनिअरने भर उन्हाळ्यात आपल्या शेतात ‘हरमन-९९’ या सफरचंदाच्या वाणाची लागवड करून फळधारणा मिळवली आहे. शाहरुख शेख हे ऑक्टोबर २०१५ पासून आयटी क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांची पत्नीही संगणक अभियंता आहे. दोघेही सध्या पुणे येथे स्थायिक आहेत. मात्र, कोरोना काळात मिळालेल्या ‘वर्क फ्रॉम होम’च्या संधीचा फायदा घेत शाहरुख यांनी गावाकडे वळून शेतीची आवड जोपासली. शेतीसाठी त्यांना राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील मामांचे मार्गदर्शन लाभले. दोन वर्षांपूर्वी त्यांनी राहुरी येथून ‘हरमन-९९’ जातीची काही रोपे आणली होती. आज ही झाडे भर उन्हाळ्यात सफरचंदांनी लगडली आहेत. हिमाचल प्रदेशातील शेतकरी हरमन शर्मा यांनी हे वाण विकसित केले आहे. इतर सफरचंदांप्रमाणे याला बर्फ किंवा अति थंडीची गरज नसते. सरासरी २१ ते २४ अंश तापमान, भरपूर सूर्यप्रकाश आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकासाठी योग्य ठरते. जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान याची लागवड होते आणि १ ते २ वर्षांत गोड व मध्यम आकाराची फळे येण्यास सुरुवात होते. उन्हाळ्यात नियमित पाणी आणि योग्य खत व्यवस्थापन केल्यास हे पीक चांगला उतारा देते. शाहरुख यांनी केवळ सफरचंदच नव्हे, तर आपल्या शेतात आणि फार्महाऊस परिसरात १५ प्रकारच्या आंब्यांसह जांभूळ (३ प्रकार), पेरू (२ प्रकार), बोर (२ प्रकार), अंजीर, चिकू, नारळ, सीताफळ, ड्रॅगन फ्रूट, लिंबू, केळी, चिंच, विलायती चिंच, संत्रा व मोसंबी अशी विविध फळझाडे लावून एक समृद्ध फळबाग उभी केली आहे. आत्मविश्वासाला बळ मिळाले! ^”सफरचंदाच्या झाडाला फळधारणा झाल्यामुळे मी खूप समाधानी आहे. आपण योग्य रीतीने संगोपन केल्यास आपल्या भागातही विविध फळांचे यशस्वी उत्पादन घेऊ शकतो, हा आत्मविश्वास या प्रयोगाने वाढवला आहे. प्रत्येकाने आपल्या घराजवळ विविध प्रजातींची फळझाडे लावून वातावरण शुद्ध राखण्यास मदत करावी.” -शाहरुख सादिक शेख, संगणक अभियंता व प्रयोगशील शेतकरी, मिरी.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर