ब्रेकिंग न्यूज
श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी
SP News Maregaon

उदय सामंतांवर महेश शिंदेंचा जोरदार पलटवार:म्हणाले- माझं नाव घेण्याचं धैर्य त्यांच्यात नाही; साताऱ्यात शिवसेनेतील संघर्ष उफाळला

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सातारा जिल्ह्यातील शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उघडपणे समोर आला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फलटणमधील मेळाव्यात नाव न घेता केलेल्या टीकेला कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. माझं नाव घेण्याएवढं त्यांचं धैर्य नाही, अशा कठोर शब्दांत महेश शिंदे यांनी उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला. या वादामुळे साताऱ्यातील शिवसेनेतील गटबाजी पुन्हा चर्चेत आली आहे. फलटण येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात बोलताना उदय सामंत यांनी काही मतदारसंघांमध्ये माझ्याशिवाय पदाधिकारी होऊ शकत नाहीत, अशी मानसिकता असलेल्या लोकांवर अप्रत्यक्ष टीका केली होती. पक्ष संघटन वाढवताना अडथळे निर्माण करणाऱ्यांना सहन केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता. जर कोणी पदाधिकारी नियुक्तीत अडथळा आणत असेल तर मी स्वतः आणि माजी खासदार राहुल शेवाळे तिथे जाऊन ठाण मांडून बसू, असे सामंत म्हणाले होते. वैयक्तिक स्वार्थासाठी पक्ष दुसऱ्यांच्या दावणीला बांधण्याचा प्रकार शिवसेनेत चालणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना महेश शिंदे यांनी आपणावर अप्रत्यक्ष निशाणा साधला गेल्याचे मान्य करण्यास नकार दिला. पक्षाविरोधात काम करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, ही प्रत्येक पक्षाची भूमिका असते. पण उदय सामंत यांच्या वक्तव्याशी माझा काहीही संबंध नाही. त्यांनी माझं नाव घेतलेलं नाही आणि ते घेण्याचं धैर्यही त्यांच्यात नाही, असा टोला त्यांनी लगावला. एवढ्यावरच न थांबता साताऱ्यात शिवसेनेतीलच एक गट विरोधकांना मदत करत असल्याचा गंभीर दावा देखील त्यांनी केला. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी तापलं आहे. साताऱ्यातील शिवसेनेतील मतभेद यापूर्वीही उघड झाले होते. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी आमदार महेश शिंदे आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यातील वाद चर्चेत आला होता. त्यावेळी महेश शिंदे समर्थक शिवसेना सदस्यांनी भाजपच्या उमेदवारांना मतदान केल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे या सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा बनल्या होत्या. त्या निवडणुकीपासून जिल्ह्यातील अंतर्गत गटबाजी अधिक तीव्र झाल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेतील संघर्षाचा नवा अध्याय आता उदय सामंत आणि महेश शिंदे यांच्यातील थेट वार-पलटवारामुळे शिवसेनेतील संघर्षाचा नवा अध्याय सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत साताऱ्यातील संघटनात्मक ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू असताना स्थानिक पातळीवरील मतभेद समोर येत आहेत. आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पक्ष नेतृत्व या प्रकरणात काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर