ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

जामखेडमध्ये महामार्ग पुन्हा‎अतिक्रमणांच्या विळख्यात‎:बीड रोड कॉर्नर ते खर्डा चौक या मार्गावरील अतिक्रमणे पुन्हा पूर्ववत‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी | जामखेड जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम काही दिवसांपूर्वी प्रशासनाकडून गाजावाजा करत राबवण्यात आली होती. मात्र, या कारवाईचा फुगा अवघ्या काही दिवसांतच फुटला आहे. बीड रोड कॉर्नर ते खर्डा चौक या मुख्य मार्गावरील अतिक्रमणे पुन्हा पूर्ववत झाली आहेत. प्रशासनाची ही मोहीम फक्त ‘एक दिवसाचा फार्स’ होती का, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने जेव्हा महामार्गावरील बेकायदेशीर बांधकामे आणि ओटे हटवले, तेव्हा रस्ता मोकळा झाल्याने जामखेडकरांनी सुटकेचा श्वास सोडला होता. वाहतूक सुरळीत झाल्याचे चित्र होते. मात्र, प्रशासनाचा पाठ फिरताच पुन्हा एकदा रस्त्याच्या दुतर्फा हातगाड्या, दुकानदारांचे व्यावसायिक साहित्य आणि इतर अडथळे उभे राहिले आहेत. यात भर म्हणून की काय, शनिवारच्या आठवडे बाजाराच्या दिवशी या मार्गावर वाहनांची आणि नागरिकांची प्रचंड गर्दी होते. रस्ता अरुंद झाल्याने पादचाऱ्यांना चालणेही मुश्कील झाले असून, वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. बीड रोड कॉर्नर ते खर्डा चौक हा राष्ट्रीय महामार्गाचा मुख्य भाग पुन्हा बाधित झाला. अतिक्रमण हटवल्यानंतर त्या जागेवर सातत्याने देखरेख ठेवण्यात नगरपरिषद आणि संबंधित विभाग पूर्णपणे अपयशी ठरत आहे. केवळ दिखाऊ मोहीम न राबवता, नियमित तपासणी करून अतिक्रमणांवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. अतिक्रमणांवर समान निकष लावून कठोर भूमिका घ्यावी अतिक्रमण मोहिमेबाबत जामखेडमध्ये एक वेगळीच चर्चा रंगली आहे. प्रशासनाने कारवाई करताना काही धनदांडग्या आणि राजकीय वरदहस्त असलेल्या व्यवसायिकांच्या अतिक्रमणांकडे कानाडोळा केला, तर केवळ सर्वसामान्यांवरच कारवाईचा बडगा उगारला, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. प्रशासनाने निवडक कारवाई न करता सर्व अतिक्रमणांवर समान निकष लावून कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. जामखेड शहरात अतिक्रमणे पुर्ववत झाली आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर