ब्रेकिंग न्यूज
Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा …
SP News Maregaon

बनावट जनगणना अर्जांत माहिती भरू नका:राज्य सरकारचे आवाहन; सोशल मीडियात फिरणाऱ्या लिंक्सपासून दूर राहण्याचा सल्ला

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


देशाचे नियोजन, विकास व कल्याणकारी योजनांसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी जनगणना प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे. पण या जनगणनेच्या नावाखाली सोशल मीडियावर काही बनावट ऑनलाइन अर्ज व लिंक फिरत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. या प्रकरणी नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर होण्याची भीती असल्यामुळे सरकारने नागरिकांना अशा लिंकपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी सरकारने दिलेल्या संकेतस्थळाशिवाय इतर कोणत्याही लिंकवर माहिती भरू नये, असे आवाहन सरकारने या प्रकरणी केले आहे. देशाच्या विकासाचा आराखडा ठरवणाऱ्या जनगणना 2027 ला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. यंदा प्रथमच नागरिकांना स्व-गणनाया डिजिटल सुविधेद्वारे स्वतःची माहिती स्वतः नोंदवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमामुळे जनगणना प्रक्रिया अधिक अचूक, पारदर्शक व तंत्रज्ञानाधारित होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. पण सोशल मीडियावर या प्रकरणी एक बोगस अर्ज व्हायरल झाला आहे. सरकारने नागरिकांना या अर्जापासून दूर राहण्याचा सल्ला देत सरकारने निश्चित केलेले संकेतस्थळ व अॅपद्वारेच आपली माहिती भरण्याचा सल्ला दिला आहे. DGIPR ने काय केले आवाहन? माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR) आपल्या पोस्टद्वारे जनतेला जनगणना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी https://se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. डीजीआयपीआरने म्हटले आहे की, जनगणना 2017 च्या अनुषंगाने सध्या सोशल मीडियावर एक अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो बनावट आणि अनधिकृत आहे. जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्यांतर्गत, नागरिकांनी खालील दोन अधिकृत माध्यमांतूनच 33 अधिसूचित प्रश्नांची माहिती देणे आवश्यक आहे. 1. स्व नोंदणी – नागरिक https://se.census.gov.in या संकेतस्थळावर माहिती भरू शकतात. फॉर्म सबमिट केल्यानंतर मिळालेला ‘SE ID’ त्यानंतर येणाऱ्या प्रगणक भेटीदरम्यान पडताळला जाईल. 2. थेट माहिती देणे – दि. १६.०५.२६ ते १४.०६.२६ या कालावधीत आपल्या घरी येणाऱ्या अधिकृत प्रगणकांकडे प्रत्यक्ष माहिती देऊन नोंदणी करता येईल. सोशल मीडिया किंवा इतर प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या कोणत्याही अनधिकृत अर्जांद्वारे, लिंकद्वारे किंवा अनोळखी व्यक्तींना आपली वैयक्तिक माहिती देऊ नका, असे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने म्हटले आहे. 1 ते 15 मेपर्यंत करता येईल स्व-गणना सरकारने स्व-गणना करण्यासाठी 1 मे ते 15 मे हा कालावधी निश्चित केला आहे. या कालावधीत नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने आपली व आपल्या कुटुंबाची माहिती भरता येणार आहे. त्यानंतर 16 मे ते 14 जून या कालावधीत घरयादी व घरणना टप्पा पार पडणार आहे. या कालावधीत नागरिकांनी स्वतःहून माहिती भरल्यास, पुढील प्रक्रिया प्रत्यक्ष भेटीत अधिक सुलभव व जलद पद्धतीने होईल. या पार्श्वभूमीवर सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागाने नागरिकांना सोशल मीडियावर फिरणाऱ्या बोगस अर्जांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. 2027 ची जनगणना प्रक्रिया पूर्णतः डिजिटल देशात 2011 पासून जनगणना झाली नाही. यावेळी होणाऱ्या जनगणनेचे वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या इतिहासात प्रथमच ही प्रक्रिया पूर्णतः डिजिटल पद्धतीने राबवली जात आहे. या जनगणनेत मोबाइल अॅप्सचा वापर, ऑनलाइन सेल्फ एन्युमरेशन व रिअल टाइम मॉनिटरिंग यांचा समावेश करण्यात आला आहे. 1931 नंतर पहिल्यांदाच या जनगणनेत जातनिहाय
२०११ नंतर देशभरात जनगणना झालेली नाही. यावेळी होणाऱ्या जनगणनेचं वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या इतिहासातील ही पहिली डिजिटल जनगणना असणार आहे. या जनगणनेत मोबाइल अॅप्सचा वापर, ऑलाइन सेल्फ एन्युमरेशन आणि रिअल टाइम मॉनिटरिंग यांचा समावेश करण्यात आला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर