ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

टेंभुर्णी- पंढरपूर महामार्ग आता होणार चार पदरी:खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर टेंभुर्णी- पंढरपूर हा चार पदरी महामार्ग होणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. फलटण ते पंढरपूर पालखी मार्गाच्या पाहणी दौऱ्यावर असताना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांनी ही घोषणा केली. टेंभुर्णी ते पंढरपूर या महामार्गावरील वाढती वाहतूक, वारकऱ्यांची मोठी संख्या, त्यातून अपघातांचे वाढते प्रमाण व वाहतूक कोंडी यामुळे या राष्ट्रीय महामार्गाच्या क्रमांक ५६१ ए च्या चौपदरीकरणासाठी खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिल्लीत अनेकवेळा भेटून तसेच दि. २० मे रोजी निवेदन देऊन नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली होती. त्याची दखल घेत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी टेंभुर्णी- पंढरपूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी डीपीआर तयार करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे पत्राने खा. मोहिते पाटील यांना कळवले होते. डीपीआर अहवालानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यामध्ये नमूद केले होते. कारखान्यांसाठी महत्त्वाचा पंढरपूर हे देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असून आषाढी व कार्तिकी वारीदरम्यान लाखो भाविक येथे येतात. तसेच हा मार्ग एन एच ६५ आणि एन एच ९६५ यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. अनेक गावं, बाजारपेठा आणि साखर कारखान्यांसाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे वाहतूक सुलभ होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर