ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

जिल्हा बँकेची निवडणूक महायुती एकत्र लढणार:अध्यक्षपदासाठी मंत्री अतुल सावे, विलास भुमरे, समीर सत्तार यांची नावे चर्चेत‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना आणि भाजप महायुती करूनच निवडणूक लढण्याचे निश्चित झाले आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे मुंबईत महायुतीच्या प्रमुखांची बैठक पार पडली. त्यामध्ये एकत्र निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे मनपा आणि जिल्हा परिषदेत स्वतंत्र निवडणुका लढवलेले हे तीनही पक्ष सहकाराची निवडणूक एकमेकांच्या साथीने लढणार आहेत. छत्रपती संभाजीनगरात २१ संचालकांच्या जागासाठी निवडणूक होत आहे. सुरुवातीला शिवसेनेच्या दिग्गज उमेदवारांवर आक्षेप घेण्यात आले होते. त्यामध्ये ४५ अर्ज अवैध ठरवण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेची इमारत. अर्ज ठरले वैध : यामध्ये माजी आमदार अण्णासाहेब माने यांचा अर्ज अवैध ठरला होता, तर आमदार संजना जाधव, सिल्लोडचे नगराध्यक्ष समीर सत्तार, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुवर्णा जाधव यांनी अपील केले होते. त्यांचे अर्ज विभागीय सहनिबंधकांकडे वैध ठरले आहेत. अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून आमदार विलास भुमरे तसेच समीर अब्दुल सत्तार यांची नावे चर्चेत आहेत. याबाबत खासदार संदिपान भुमरे म्हणाले की, महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार आहोत. अध्यक्षपदाचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर उपमुख्यमंत्री घेतील. एकनाथ शिंदे ज्यांचे नाव सुचवतील तेच अंतिम असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपकडून अतुल सावे यांचे नाव चर्चेत आहे. बँकेत चांगले प्रशासक जावेत यासाठी निवडणूक लढवत असल्याचे ते म्हणाले. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आम्ही एकत्रित लढणार आहोत. जागावाटपाचा निर्णय अंतिम करणार आहोत. लवकरच याचा निर्णय होईल असे ओबीसी विकास मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. महायुती म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढवणार आहोत. त्यासाठीचा निर्णय झाला आहे. जागावाटपाबाबत चर्चा सुरू असून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या दालनात शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये ही बैठक पार पडली. यामध्ये ओबीसी विकास मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार, आमदार सतीश चव्हाण यांच्यासमवेत बैठकीत जागांवर चर्चा झाली आहे. त्यामध्ये महायुती करण्याबाबतचा निर्णय झाला. रविवारी पुन्हा याबाबत बैठक घेऊन जागावाटप अंतिम केले जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर