ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

पात्र नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देणार:त्यांचा सक्रीय सहभाग वाढविण्यावर भर देणार, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची ग्वाही

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध शासकिय योजनांवर भर देऊन त्यामध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याचे प्रयत्न केले जाणार असून आगामी काळात रोजगार व नवीन उद्योग उभारणीकडे विशेष लक्ष दिले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी समाज माध्यमांना दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये दिली आहे. हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी समाज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हिंगोली जिल्हयाची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक परिस्थिती मांडली. प्रशासन, विकास आणि लोकसहभाग यांचा समतोल साधत जिल्ह्यात राबविण्यात असलेल्या योजनांचीही त्यांनी माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने शासकिय योजनांमधून नागरीकांचा सक्रीय सहभाग वाढवून जास्तीत जास्त पात्र नागरीकांपर्यंत शासकिय योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हिंगोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाची सकारात्मक भुमीका असल्याचेल सांगतक त्यांनी जिल्ह्यात महसूल अभियान, आरोग्यविषयक मोहिमा, सिंचन प्रकल्प तसेच पायाभूत सुविधा विकासाच्या कामांद्वारे नागरिकाभिमुख सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली. शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय पर्यटन विकास, शेती क्षेत्रातील नव्या संधी, युवकांसाठी कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मिती तसेच महिला स्वयंरोजगारासाठी स्थानिक संसाधनांचा प्रभावी वापर याबाबत प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हिंगोली जिल्हयात महिलांनी उत्पादित केलेल्या हळदीला अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी मिळावी यासाठी हिंगोली गोल्ड हळद चे ब्रँडींग करण्यात आले. लोकप्रतिनिधी तसेच उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊन त्या त्या जिल्हयातून हिंगोली गोल्ड हळदीची मागणी नोंदविण्याची विनंती त्यांनी केली. या शिवाय बचतगटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तू तसेच खाद्यपदार्थांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शहरी तसेच ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर