ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

शेतकऱ्यांचे तीन दिवसांपासून नाल्यात ठिय्या आंदोलन:कंजारा येथे नाला सरळीकरण करण्याची मागणी, पावसामुळे होतेय ३०० एकर क्षेत्राचे नुकसान

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


औंढा नागनाथ तालुक्यातील कंजारा येथील नाल्याचे खोलीकरण करून सरळीकरण करावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मागील तीन दिवसांपासून नाल्यातच ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. मृद व जलसंधारण विभागाने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांतून तिव्र संताप व्यक्त केला जात आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी व कंजारा माळरानावरून मोठ्या नाल्याचा उगम आहे. या नाल्याचे पाणी कंजारा शिवारातून पुढे कयाधू नदीमध्ये जाते. सदरील नाला उथळ व अरुंद असल्याने दरवर्षी थोड्या पावसातही माळरानावरील पाणी नाल्यात येते. मात्र अरुंद नाल्यामुळे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मोठे नुकसान होते. मागील काही वर्षापासून परिसरातील सुमारे ६० ते ७० शेतकऱ्यांचे ३०० एकर क्षेत्राचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीपाच्या पिकावर पाणी सोडावे लागत आहे. दरम्यान, या नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण करण्याचा ठराव ग्रामपंचायत कार्यालयाने सन २०२२ मध्ये मृद व जलसंधारण विभागाकडे दिला होता. मात्र या ठरावाकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आॅक्टोबर २०२५ मध्ये विभागाला निवेदन दिले होते. त्यानंतर या विभागाने तीन किलो मिटर अंतराच्या नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण करण्याचे अंदाजपत्रक तयार केले. मात्र या अंदाजपत्रकाला मान्यताच मिळाली नाही. या प्रकारामुळे संतप्त शेतकरी प्रविण कल्याणकर, डिगांबर कल्याणकर, गणेश कल्याणकर, दत्तराव कल्याणकर, मंचक कल्याणकर, रामेश्‍वर कल्याणकर, कृष्णा कल्याणकर, मनोज कल्याणकर, सुधाकर कल्याणकर, शेषराव कल्याणकर, संतोष कल्याणकर यांनी ता. १५ मे पासून नाल्यामध्येच ठिया आंदोलन सुरु केले आहे. मागील तीन दिवसांपासून आंदोलन सुरु असतांनाही प्रशासनाचा एकही अधिकारी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी गेला नाही. या प्रकारामुळे शेतकऱ्यांतून तिव्र संताप व्यक्त होत असून मागणी मान्य झाल्या शिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भुमीका शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मृद व जलसंधारणाची चुक शेतकऱ्यांच्या माथी – प्रविण कल्याणकर, शेतकरी या संदर्भात शेतकऱ्यांनी मृद व जलसंधारण विभागाशी संपर्क साधला होता. मात्र नाल्याच्या कामाचे अंदाजपत्रक मार्च पुर्वी झाले असते तर जिल्हा नियोजनमधून निधी देता आला असता असे सांगण्यात आले. मात्र अंदाजपत्रक तयार करण्याचे काम मृद व जलसंधारण विभागाचे आहे. मात्र त्यांच्याकडून चूक मान्य केली जात नाही.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर