ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

बनावट कुणबी प्रमाणपत्रांमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात:महाराष्ट्रात झुंडशाहीच्या जोरावर हुकूमशाही सुरू आहे का? लक्ष्मण हाकेंचा जरांगे पाटलांवर निशाणा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ओबीसी रकाण्यात यापुढे केवळ मराठा कुणबी असणार का? मनोज जरांगे यांच्या सांगण्यावर मराठा कुणबी ओबीसीत आला असेल तर त्यांच्या स्पर्धेत मराठा कुणबी स्पर्धेत टिकू शकत नाही, असे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. 60 टक्के लोकांच्या हक्काचे संरक्षण करण्यात मुख्यमंत्री फेल झाले आहेत. आमचे अधिकार संपले आहे, यावर कोणताही पक्ष बोलत नाही, आमच्या समाजाला वाऱ्यावर सोडले आहे. लक्ष्मण हाके म्हणाले की, मनोज जरांगे नावाच्या माणसाला अक्कल नाही. सामाजिक, राजकीय आंदोलनातील गुन्हे हे संपलेले असतात. ज्यांच्यावर गंभीर गुन्हे असतील ते मागे घेता येणार नाहीत. सरकारने जर गंभीर गु्न्हे मागे घेतले तर सरकार काय भूमिका घेते असे म्हणावे लागेल. सरकारने जरांगेचे लाड करू नये. आम्ही सुद्धा तुम्हाला निवडून दिले आहे. जेन झी काय करू शकते हे दोन दिवसात कळाले असेलच. सीएम जरांगेंना गांभीर्याने घेत नाही लक्ष्मण हाके म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जर प्रसाद लाड यांना पाठवत असतील तर चिंतेची बाब आहे. एखादा उद्योग करणारा माणूस या चर्चेला पाठवला म्हणजे मुख्यमंत्री जरांगेंना गांभीर्याने घेत नाही. जरांगे पाटील यांचा अभ्यास नाही, त्यांना राजकीय लोकं स्क्रीप्ट पाठवतात. फडणवीसांची खूर्ची हलवण्यासाठी हे आंदोलन आहे. म्हणून प्रसाद लाड यांच्या सारख्या माणसाला मुख्यमंत्र्यांनी पाठवले आहे. जातनिहाय जात गणना झाली पाहिजे लक्ष्मण हाके म्हणाले की, ओबीसी समाजाची जातनिहाय जात गणना झाली पाहिजे. संख्या न कळाल्याने योजनांना निधी मिळत नाही. समाज सत्तेत नसल्याने आपल्या समाजाचे अधिकार राज्यकर्त्यांनी काढून घेतले आहे. त्यासाठी आम्ही महाराष्ट्रभर 100 सभा घेणार आहोत. या माध्यमातून आम्ही ओबीसी समाजाला जागे करण्याचा प्रयत्न करत आहोत. झुंडशाही कोण करते हे जनतेला माहिती आहे. मुंबईमध्ये जात तिथे जनतेना कोण वेठीस धरते आहे? कुणबी दाखले द्या कोण म्हणत आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण संपले लक्ष्मण हाके म्हणाले की, झुंडशाहीच्या जोरावर महाराष्ट्रात कोणी हुकुमशाही करण्याचा प्रयत्न करत आहे का? हा आमचा सवाल आहे. आमचे राजकीय आरक्षण डुबले आहे. महत्त्वाच्या ओबीसी आरक्षणावर कुणबी मराठा रुप बघायला मिळाले. एका नगरपरिषदेत ओबीसींच्या 9 पैकी 9 जागा मराठा कुणबी हे फेक प्रमाणपत्र असलेले लोकं निवडून आले.ओबीसीच्या बाबतीमध्ये दुजाभाव झाला. हीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात दिसून आली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर