ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र:हा सरकारी तिजोरीचा अपहार, योजना राबावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा- संजय राऊत

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्रात गाजलेली लाडकी बहीण योजनेत जवळपास 80 लाख महिला अपात्र ठरल्याचे समोर आले आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, मत विकत घेण्यासाठी सरकारी तिजोरीचा हा उघड उघड अपहार आहे. ज्यांनी ही योजना राबवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. संजय राऊत म्हणाले, साधारण एक कोटी रुपयांची अफरातफर केली. मत विकत घेण्यासाठी सरकारी तिजोरीचा हा उघड उघड अपहार आहे. ज्यांनी ही योजना राबवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. बँकेत किंवा 500 रुपयांचा जरी अपहार झाला तरी त्यांना बडतर्फ केले जाते आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, अजित पवार दुर्दैवाने आता नाहीत. पण या तिघांनी जनतेच्या तिजोरीचा अपहार करून अपात्र महिलांना पैसे देऊन मते विकत घेतली. ही निवडणूकच रद्द करायला पाहिजे. ज्या पद्धतीने महिलांची मते विकत घेतलीत. विकत घेतली इथपर्यंत ठीक आहे, पण 80 लाखांहून अधिक अपात्र महिलांना तुम्ही पैसे दिले हे समोर आले आहे. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन उपमुख्यमंत्री या तिघांवर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. पण मोदी युग आहे. कलियुग पण नाही. पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात जे लोक सोडून गेले, पक्षांतर केले, एका तिकिटावर निवडून आले आणि दुसऱ्या तिकिटावर जातात, त्यांनाही फोडायला पाहिजे होते. हे मी म्हणत नाही, ही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती. ते म्हणायचे फुटला तर फोडा. विमाने घेऊन कोणी ग्रामपंचयातीच्या निवडणुकीला फिरते का? मुंबईच्या व्यतिरिक्त शिवसेना ठाकरे गटाचे नेते कुठे दिसत नाहीत, असा आरोप केला जातो, त्यावर संजय राऊत म्हणाले, असे कोण म्हणते? मी कुठे दिसतो? मी चंद्रावर दिसतोय का? हे काही पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नाही की ग्राम पंचायतीच्या निवडणुकीलाही मुख्यमंत्र्यांनी जायला पाहिजे. काही निवडणुका स्थानिक पातळीवर आम्ही सोडतो. हेलिकॉप्टर घेऊन, विमाने घेऊन कोणी ग्रामपंचयातीच्या निवडणुकीला फिरते का? या देशाच्या इतिहासात पंडित नेहरूंना कधी असे पाहिले नाही, न इंदिरा गांधींना पाहिले. वसंतदादा पाटलांना पाहिले नाही, शरद पवारांना पाहिले नाही. हे नवीन झंगाट जे सुरू केले आहे, की ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना, नगरपालिकेच्या निवडणुकांना चार्टर फ्लाइट, हेलिकॉप्टर घेऊन फिरायचं. स्थानिक निवडणुका या स्थानिक लोकांवर सोडल्या पाहिजेत. भाजप हा स्लो पोयझनिंग सारखा शिवसेना शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपला जागा सुटलेली असतानाही अब्दुल सत्तार यांच्या मुलाने उमेदवारी अर्ज भरला आहे. तसेच अब्दुल सत्तार यांनी भाजप हा शिवसेनेला संपवायला निघाला आहे, असे म्हटले होते. यावर संजय राऊत म्हणाले, शिवसेनेला नाही, शिंदे गटाला. त्यांच्या गटाला असेल. आम्ही योग्य वेळी बाहेर पडलो. ते गृहस्थ असे म्हणत आहेत की भाजप हा स्लो पोयझनिंग सारखा आहे. कोणाला पश्चाताप झाला असेल, तर त्यांनी उद्धव ठाकरेंकडे यावे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र आली पाहिजे असे म्हटले होते. यावर संजय रराऊत म्हणाले, बरोबर आहे, हे प्रत्येकाचे वैयक्तिक मत असू शकते. मलाही असे अनेकदा वाटते की जर कोणाला पश्चाताप झाला असेल, ज्या पद्धतीने भाजप यांना अपमानित करत आहेत आणि जर कोणाला वाटले की आमची चूक झाली, आम्हाला भ्रमात ठेवले गेले, आम्ही बहकलो. तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात यायला पाहिजे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर