ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

तासाभरात १९ मिमी पाऊस‎:वादळामुळे झाडे कोसळली; सायंकाळी ७ नंतर पुन्हा पाऊस‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी | अमरावती चार दिवसांच्या खंडानंतर सोमवारी (दि. १) शहरात दुपारी साडेतीन वाजताच्या आसपास जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे एक तास सोसाट्याचा वारा आणि पाऊस शहरात कोसळत होता. या एका तासामध्ये शहरात १९ मिमी पावसाची नोंद हवामान विभागाने केली आहे. यावेळी सोसाट्याचा वारा असल्यामुळे शहरातील काही भागात झाडे कोसळली असून लहान आकाराची गारसुध्दा पडली होती. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. एका तासात १९ मिमी पाऊस झाल्याची नोंद हवामान विभागाने केली आहे. आतापर्यंत यंदाचा सर्वाधिक मान्सुनपुर्व पाऊस ठरला आहे. पावसासोबतच काही भागात गारा कोसळल्या तर वाऱ्यामुळे मुख्य चौकांमध्ये लावलेले जाहीरातींचे फलक फाटले तर काही ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर पडले होते. शहरात दुपारी चार वाजताच्या सुमारास झालेल्या मान्सुनपूर्व वादळी पावसामुळे विविध परिसरात ११ मोठी झाडे कोसळल्याने परिसरातील वाहतूक खोळंबली. अग्निशमन विभागाने कॉल आल्यानंतर तत्काळ कारवाई करीत ही कोसळलेली झाडे रस्त्यावरून बाजुला केली. श्याम चौकातील ‘जे ॲन्ड डी’ मॉलच्या दर्शनी भागाचे सौंदर्य वाढवण्यासाठी बसवण्यात आलेली डेकोरेटिव्ह ग्लास शीट वादळी पावसामुळे धोकादायकरित्या खाली झुकली असून ती कधीही कोसळू शकते. परिणामी ती तत्काळ कापण्यात यावी, असे निर्देश अग्निशमन विभागाने मॉलच्या बिल्डरला दिल्याची माहिती केंद्र प्रमुख प्रेमानंद सोनकांबळे यांनी दिली. डॉ. प्रवीणकुमार, हवामानशास्त्रज्ञ, प्रादेशिक हवामान केन्द्र, नागपूर. आणखी तीन दिवस पावसाची शक्यता असणार…. हा मान्सूनपुर्व पाऊस असून आगामी तीन दिवस जिल्ह्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच तापमानात आता तीन ते चार अंशांनी घट आली आहे. मान्सून जिल्ह्यात दाखल होण्यासाठी किमान १५ जून उजाडणार आहे. मंगळवारी (दि. २) मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर