ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

पुण्यात मानवतच्या तरुणाची आत्महत्या:लिव्ह-इन पार्टनरसह चौघांना अटक, पैशांसाठी गुन्ह्यात अडकवण्याच्या दिली होती धमकी

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुण्यात एका तरुणाने गुन्ह्यात अडकवण्याच्या धमकीमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी त्याच्या लिव्ह-इन पार्टनरसह चौघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना खराडी भागात घडली असून, आरोपींनी पैशांसाठी तरुणाला त्रास दिला होता. करण बाळासाहेब कांबळे (वय २८, मूळ रा. खरबा, मानवत, जि. परभणी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी प्रीती अनिकेत बोढर्डे उर्फ रमिसा उर्फ माही, उर्फ प्रीती सुधीर रणदिवे (वय ३१, रा. थिटे वस्ती, खराडी), अनिकेत बोढर्डे (वय ४१, रा. जेघेनगर, बिबवेवाडी), संस्कृती सुधीर रणदिवे (वय २५) आणि ऋतीक सुधीर रणदिवे (वय २६, दोघे रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रीती आणि करण यांची ओळख झाली होती. प्रीतीचे यापूर्वी दोन विवाह झाले होते आणि ती पतीशी न पटल्याने वेगळी राहत होती. ओळखीतून प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर करण आणि प्रीती खराडीतील थिटे वस्ती परिसरात एकत्र राहू लागले होते. त्यानंतर प्रीतीचा पहिला पती अनिकेत बोढर्डे, तिची बहीण संस्कृती आणि भाऊ ऋतीक यांनी करणला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांनी करणकडे पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिली. आरोपींच्या या सततच्या त्रासामुळे आणि धमकीमुळे करण नैराश्यात गेला होता. अखेर, १ जून रोजी करणने खराडीतील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, असे करणचा भाऊ कृष्णा कांबळे (वय ३४, सध्या रा. थिटे वस्ती, खराडी) यांनी खराडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. कृष्णा कांबळे यांच्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर