ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

बोजवारा:शहरात दीड तास पाऊस, रस्त्यावर पाणी; नालेसफाईचा दावा पाण्यात, गल्लीत नाल्या तुंबून रस्त्यावर पाणी

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


लातूर शहर आणि जिल्ह्यात रविवारी (दि. २८) दुपारी आणि सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. या पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी, पहिल्याच मोठ्या पावसात शहरातील ड्रेनेज व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे समोर आले आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास आलेल्या दीड तासाच्या पावसामुळे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण कार्यालय आणि सर्व शिक्षा अभियान कार्यालयाच्या आवारात गुडघाभर पाणी साचले. यामुळे शासकीय कामासाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली. तसेच, मुख्य बाजारपेठेत पाणी शिरण्याची भीती निर्माण झाल्याने व्यापाऱ्यांची धांदल उडाली. रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून पडण्याचे प्रकारही घडले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने औसा रोड, कपिल नगर, वैभव चौक आणि खोरे गल्लीत नाल्या तुंबून रस्त्यावर पाणी आले. महापालिकेने १३६ मोठ्या नाल्यांची मान्सूनपूर्व सफाई केल्याचा दावा केला असला तरी, नागरिकांनी फेकलेल्या प्लास्टिकमुळे नाल्या चोक-अप झाल्याचे मनपाच्या प्राथमिक पाहणीत आढळले. मनपाच्या पथकाने तातडीने अडथळे दूर केले. ^मान्सूनपूर्व कामामध्ये नाल्यांची सफाई करण्यात आलेली आहे. नालीमध्ये कचरा, प्लास्टिक बॉटल-पिशव्या टाकू नये. जेणेकरून पाणी तुंबणार नाही . – रमाकांत पिडगे, विभागप्रमुख पावसाळ्यासाठी स्वच्छता निरीक्षक आणि मुकादमांच्या नेतृत्वाखाली १५ कर्मचाऱ्यांचे विशेष आपत्कालीन पथक सज्ज ठेवले. संध्याकाळी उद्भवणाऱ्या पाणी साचण्याच्या तक्रारींचे निवारण टीम मार्फत केले जाणार आहे. सायंकाळच्या पावसानंतर औसा रोड, कपिल नगर परिसरातील नाल्या तुंबल्याच्या तक्रारी आल्या. स्वच्छता विभागाने पाहणी केली असता, नागरिकांनी नाल्यांमध्ये टाकलेल्या प्लास्टिक बाटल्या आणि पिशव्यांमुळे पाण्याचा प्रवाह बंद झाल्याचे समोर आले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर