ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

संजय राऊतांनी आदित्य ठाकरेंना संपवण्याची सुपारी घेतली आहे का?:उबाठा गट ताब्यात घेण्यासाठी राऊतांचे प्रयत्न- नवनाथ बन

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मिठी नदीचे नाव काढत संजय राऊत आदित्य ठाकरेंना अडचणीत आणण्याचे काम करत आहेत. मिठी नदी कोणाला विकली, तिचा गाळ खात कोण श्रीमंत झाले, त्यातून कुणी घरे बांधले हे मुंबईकरांना माहिती आहे. दिनु मोर्या कुणाचा मित्र होता, कुणाच्या मित्राची चौकशी झाली, मिठीच्या माध्यमातून कशा पद्धतीने मुंबईकरांना लुटले याची संपूर्ण माहिती सर्वांना आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात जोराचे भांडण सुरू आहे. रोज उठायचे मिठी नदीचे नाव घेत त्यामधील भ्रष्ट्राचार बाहेर आला पाहिजे यासाठी राऊत प्रयत्न करत आहे. ते समोर आले की आदित्य ठाकरे आणि कंपनीचा भ्रष्टाचार पुढे येणार आदित्य ठाकरेंना बदनाम करण्यासाठी राऊत रोज त्यावर बोलत आहेत. आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याची सुपारी नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी सुपारी घेतली आहे की येणाऱ्या काळात आदित्य ठाकरे यांना संपवायचे आणि उबाठा गट आपल्या ताब्यात घ्यायचा, म्हणून मिठी नदीचे नाव वारंवार त्यांच्याकडून घेण्यात येत आहे. आदित्य ठाकरेंना या प्रकरणी अडचणीत आणण्याचे काम राऊतांकडून सुरू आहे. या नदीचा गाळ खाणाऱ्यांना सोडले जाणार नाही. अदानी-अंबानींच्या लग्नात जाऊन कुणी डान्स केला होता. कोणी हात जोडले होते हे महाराष्ट्राने पाहिले आहे. घरगुती सिलिंडर कमी पडणार नाही नवनाथ बन म्हणाले की, सरकार अफवा पसरवण्याचे काम करत नाही तर माहिती देण्याचे काम करते. राऊतांकडून रोज सकाळी अफवा पसरवण्याचे काम होते. आज शहरामध्ये बुकींग करताच 25 दिवसांमध्ये सिलिंडर मिळते. साठेबाजीमुळे काही ठिकाणी तुटवडा आहे, पण घरगुती सिलिंडर कमी पडणार नाही.गॅसचा पाईप असेल तर सिलिंडर का हवे आहे.लोकांना सिलिंडर मिळू नये म्हणून त्यांच्याकडून हे प्रयत्न सुरू आहे. 40 देशांतून कच्च्या तेलाची आयात नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 140 कोटी भारतीयांची काळजी घेण्यासाठी सक्षम आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात रोज बैठका होत असून आपन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. इराणकडून सुरक्षितपणे पुरवठा झाला पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर 40 देशांकडून कच्चे तेल आपण आयात करत आहोत.आपल्याकडे कुठेही पेट्रोल-डिझेलसाठी रांगा लागलेल्या नाहीत. फक्त काही ठिकाणी गॅसचा प्रश्न निर्माण झाला आहे, पण त्याचा फटका जनतेला बसू नये याची पूर्ण काळजी सरकार घेत आहे. राऊतांसारखे घरात बसणारे हे सरकार नाही.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर