ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

पुण्यात 11 लाखांची ब्राऊन शुगर जप्त:वाघोली पोलिसांच्या दोघांना बेड्या, बसस्टॉपवर सापळा रचून पकडले

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


वाघोली पोलिसांनी ब्राऊन शुगरची विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 11 लाख 38 हजार 900 रुपये किमतीची ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली. या प्रकरणी दोघांविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शिव कालू सिंह (वय 33, रा. बालाजीनगर, वाघोली, मूळ रा. जोधपूर, राजस्थान) आणि मांगीलाल (रा. आकुर्डी) अशी आहेत. सहायक पोलीस फौजदार बाबासाहेब मोराळे यांनी वाघोली पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर रस्त्यावरील केसनंद येथील एका बसथांब्यावर आरोपी शिवसिंह ब्राऊन शुगर विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडून ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली. चौकशीदरम्यान, शिवसिंहने ही ब्राऊन शुगर आकुर्डी येथील मांगीलाल याच्याकडून आणल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मांगीलाललाही ताब्यात घेतले. वाघोली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पिस्तूल बाळगणारे दोन सराईत जरबंद दरम्यान, पिस्तूल बाळगणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना लक्ष्मीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे साजिद उर्फ डीजे मोहम्मद शेख (वय 20, रा. कामराजनगर, येरवडा) आणि शुभम राजेंद्र बोत (वय 26, रा. ढवळे वस्ती, घोरपडी) अशी आहेत. हे दोघेही सराईत गुन्हेगार असून, शेख याच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखल होता आणि तो तेव्हापासून फरार होता. तपास पथकातील पोलीस कर्मचारी अक्षय शिंदे, कादीर शेख आणि अमोल गायकवाड यांना शेख त्याच्या घरी येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचला असता, शेख आणि त्याचा साथीदार बोत हे पोलिसांना पाहून घराच्या खिडकीतून उतरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी पाठलाग करून दोघांना पकडले आणि त्यांच्याकडून पिस्तूल व काडतूस जप्त केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर