ब्रेकिंग न्यूज
⚡ Pune News: फटाक्यांवरून मध्यरात्री पुण्यात राडा, वडिलांना वाचवायला गेलेल्या लेकीसोबतच भयंकर घडलं, क्षणात रक… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल… ✦ ⚡ कटिंग चहा देखील महाग होणार! मदर डेअरीपाठोपाठ 2 कंपन्यांनी वाढवले दुधाचे दर, नवे दर आजपासून लागू ✦ ⚡ Cricket Rule : ना कॅच, ना रन आऊट, ना बोल्ड… अंपायरने भलत्याच कारणासाठी दिलं आऊट, क्रिकेटमधली सगळ्यात विचि… ✦ ⚡ Supriya Sule: “तुझ्याशिवायची पहिली भाऊबीज…” अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, ”आम्हा बह… ✦ ⚡ CRIME : आईने पोटच्या 24 वर्षाच्या पोराला संपवलं, कोल्ड ड्रिंकमधून झोपेच्या गोळ्या दिल्या अन्… एका गोष्टीस… ✦ ⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं… ✦ ⚡ पांडवदेवीच्या पावन भूमीत आज गोवर्धन यात्रेचा भक्तीमय जयघोष! ✦ ⚡ दुष्काळामुळे मेंढपाळ व्यवसाय आर्थिक संकटात, अचानक घसरले दर, सोलापूरमधील भीषण वास्तव, Video ✦ ⚡ CRIME : ब्लँकेटमध्ये गुंडाळून उजनी धरणात फेकलं, विवाहित महिलेच्या हत्येचं गुढ अखेर उकललं! पोलिसांनी 2 तासात…
SP News Maregaon

हिंगोलीतील बड्या मॉलच्या पिठात आळ्या:ग्राहकाच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाचा छापा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली शहरातील एका बड्या मॉलमध्ये पिठाच्या बॅगमध्ये आळ्या निघाल्याच्या प्रकारानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी ता. 11 दुकानात जाऊन पिठाचे तीन नमुने तपासणीसाठी घेतले या शिवाय इतर खाद्य पदार्थांचे 45 अनौपचारिक नमुनेही घेण्यात आले. मात्र या कारवाईची कानोकान खबरही कोणाला लागू दिली नाही. एवढेच नव्हे तर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपला मोबाईल नंबर कोणालाही देऊ नका अशी सूचना वजा तंबीच सहकारी अधिकारी व कार्यालयाला दिली आहे. हिंगोली येथील एका बड्या मॉलमधे एका ग्राहकाने गव्हाच्या पिठाचे पाकिट घेतले. सदर पाकिट घरी जाऊन फोडल्यानंतर त्यात काही आळ्या निघाल्या. त्यामुळे ग्राहकाने पाकिट जसेच्या तसे आणून मॉलच्या व्यवस्थापकाला दाखविल्यानंतर त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. याप्रकारानंतर त्या ग्राहकाने परभणी येथून चालणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाकडे तोंडी तक्रार केली. मात्र सदर मॉल बड्या कंपनीचा असल्याने अधिकारीही नमुने घेण्यासाठी धजावत नव्हते. पण आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून कारवाईच्या धास्तीने अधिकारी गुरुवारी ता. 11 हिंगोलीत आले त्यांनी संबधित मॉलला भेट दिली अन तीन नमुने काढले या शिवाय इतर खाद्य पदार्थ्यांचे अनौपचारीक नमुने घेतले अन अधिकाऱ्यांनी हिंगोलीतून काढता पाय घेतला. विशेष म्हणजे एरव्ही लहान कारवाईची रंगवून माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांनी सदर कारवाईची मात्र कोणाला कानोकान खबरही होऊ दिली नाही. या शिवाय आपला मोबाईल नंबर कोणालाही देऊ नका अशी सूचना वजा तंबीही त्यांनी सहकारी अधिकाऱ्यांना तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दिली. त्यामुळे या कारवाईची माहिती गोपनीय का ठेवली जात आहे याबाबत उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. या संदर्भात अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त पवन खताळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर मॉल मधून तीन नमुने तपासणीसाठी घेतले तसेच इतर अनौपचारिक 45 नमुने घेतल्याचे सांगितले. या कारवाईबाबत जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयास कळविल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर