ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

गडकरींचे टाटांना पत्र:नागपूर-मुंबई विमानसेवा पूर्ववत करण्याची मागणी, एअर इंडियाने फेऱ्या रद्द केल्याने औद्योगिक विकासावर परिणाम

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांना पत्र लिहून नागपूर-मुंबई विमानसेवा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. एअर इंडियाने नागपूरहून मुंबईसाठीच्या विमानांची संख्या कमी केल्याने आणि काही फेऱ्या रद्द केल्याने विदर्भाच्या औद्योगिक विकासाला बाधा येत असल्याचे गडकरींनी पत्रात म्हटले आहे. नागपूर येथील ‘असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट’ या संस्थेने विमानसेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत गडकरींकडे दाद मागितली होती. या मागणीची गंभीर दखल घेत गडकरींनी थेट टाटा समूहाच्या प्रमुखांना पत्र पाठवले. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून, विदर्भातील व्यापार, उद्योग, गुंतवणूक आणि प्रशासकीय कामकाजासाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे या मार्गावरील विमाने रद्द केल्याने व्यावसायिक प्रवास आणि प्रवाशांच्या सोयींवर प्रतिकूल परिणाम होत असल्याची भीती त्यांनी पत्रात व्यक्त केली. गडकरींनी पत्रात नागपूरच्या ऐतिहासिक महत्त्वाचाही उल्लेख केला. सुमारे १०० वर्षांपूर्वी टाटांच्याच मालकीखाली सुरू झालेल्या ‘नाईट एअर मेल सर्व्हिस’चे नागपूर हेच मुख्य केंद्र होते. तसेच, केंद्र सरकारने नुकतीच पीपीपी तत्त्वावर नागपूर विमानतळाच्या आधुनिकीकरणाची जबाबदारी जीएमआर समूहाकडे सोपवण्यास मंजुरी दिली आहे, ज्यामुळे नागपूर देशातील एक प्रमुख विमान वाहतूक केंद्र म्हणून विकसित होत आहे. या सर्व बाबींचा आणि विमान प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा विचार करता, प्रादेशिक कनेक्टिव्हिटी टिकवून ठेवण्यासाठी एअर इंडियाने नागपूर-मुंबई दरम्यानची किमान एक सकाळ किंवा संध्याकाळची विमान फेरी तातडीने पूर्ववत करणे आवश्यक आहे. चंद्रशेखरन यांनी या प्रकरणात तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी विनंती गडकरींनी केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर