ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

पुणे विषारी दारूकांडाचे ‘भिवंडी’ कनेक्शन:कंपनीतून 5,929 किलो मिथेनॉल जप्त, कंपनीचा मालक ताब्यात, परवानाही रद्द हाेणार, दारूकांडातील बळी 18 वर

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १८ जणांचा बळी घेणाऱ्या विषारी दारू प्रकरणात थेट भिवंडी कनेक्शन समोर आले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार भिवंडी येथील ‘मे. रेक्स इंटरनॅशनल’ कंपनीच्या गोदामावर छापा टाकून तब्बल ५,९२९ किलो विषारी मिथेनॉल जप्त केले आहे. याच रसायनाचा वापर दारूमध्ये केल्याचे तपासात उघड झाले. फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर परिसरात ३० रुपयांत मिळणारी घातक गावठी दारू पिण्यामुळे १८ लोकांचा बळी गेला. तपासात दारूत अत्यंत घातक ‘मिथेनॉल’ मिसळल्याचे समोर आले. कर्नलसिंग विरका (फुगेवाडी) यांनी योगेश वानखेडेकडून दारू घेतली होती. योगेशने ती उरुळी कांचन येथील राजूप्रजापतीकडून आणली होती. राजूने हा विषारी साठा थेट भिवंडीतील रेक्स इंटरनॅशनलकडून मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी ८ तस्करांना अटक केली असून सीआयडी तपासात या रॅकेटची पाळेमुळे समोर येण्याची शक्यता आहे. मालक ताब्यात, कंपनीचा परवाना रद्द होणार पॉयझन्स ॲक्ट अंतर्गत खरेदी-विक्रीची नोंदवही सादर करण्यास कंपनी अपयशी ठरल्याने गोदाम तात्काळ सील केले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने मालक अरुण कुमार चौबे आणि अभिषेक आसन कुमार चौबे यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. तसेच, एफडीएने परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीसही बजावली. अधिक नशेसाठी दारूत विषारी मिथेनॉलचा वापर औद्योगिक वापराचे मिथेनॉल अत्यंत विषारी असते. उत्पादन खर्च कमी करून नशा वाढवण्यासाठी अवैध दारू माफिया याचा वापर करतात. मानवी शरीरात मिथेनॉलचे रुपांतर घातक फॉर्मिक ॲसिडमध्ये होते. यामुळे थेट मज्जासंस्थेवर परिणाम होऊन अंधत्व येते आणि अवयव निकामी होऊन मृत्यू होतो. ९ पोलिसांसह २२ अधिकाऱ्यांचे निलंबन अवैध दारू विक्री रोखण्यात अपयशी ठरल्याने पुणे व पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील ९ पोलिस अधिकारी (हडपसर आणि दापोडी चौकी) आणि उत्पादन शुल्क विभागाच्या १३ अशा एकूण २२ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर