ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अजित पवारांच्या बाबतीत दाल में कुछ तो काला हैं:भास्कर जाधव यांचे विधान; दादांचे ‘ते’ विधान अन् त्यानंतरच्या घटनाक्रमावर वेधले लक्ष्य

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी आज पुन्हा एकदा दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूविषयी संशय व्यक्त केला आहे. अजित पवारांनी 15 जानेवारीपर्यंत जी विधाने केली होती व त्यानंतर त्यांना अप्रत्यक्षपणे दम देण्यात आला. त्यामुळे अजित पवारांचा झालेला अपघाती मृत्यू हा निव्वळ योगायोग आहे की, षडयंत्राचा भाग आहे याचा शोध तपास यंत्रणांनी घ्यायला हवा, असे ते म्हणालेत. अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले. तेव्हापासून सत्ताधारी व विरोधी बाकावरील काही आमदार हा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा संशय व्यक्त करत आहेत. या आमदारांनी हा मुद्दा विधिमंडळाच्या पटलावर उपस्थित करत त्यावर चर्चा करण्याचीही मागणी केली आहे. पण सातत्याने ही चर्चा लांबणीवर टाकली जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार भास्कर जाधव यांनी उपरोक्त विधान केले आहे. ते म्हणाले, अजित पवार यांचा अपघात होता की घातपात होता? देशात व राज्यात ज्यांनी – ज्यांनी ही घटना पाहिली त्यांच्या मनात ही घटना अपघात नव्हे तर घातपातच होता अशी भावना होती व ती आजही आहे. ज्या गोष्टी व जी वक्तव्य समोर येत आहेत, त्यामुळे ही भावना अधिक दृढ होत आहे. अपघात झाला नाही तर घातपात झाला याविषयाला पुष्टी मिळत आहे, असे भास्कर जाधव म्हणाले. अजित पवारांच्या त्या विधानानंतरचा सांगितला घटनाक्रम ते पुढे म्हणाले, अजित पवारांच्या अपघाताचा विषय अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणी उथळ विधान करणे योग्य नाही. पण पहिल्या दिवसापासूनच माझ्या मनात एक विषय होता की, पिंपरी चिंचवड येथील भाषणात अजितदादांनी पहिल्यांदा सांगितले की, ज्यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले व ज्यांनी मी 70 हजार कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला त्यांच्याच मांडीला मांडी लावून मी सरकारमध्ये बसलो आहे. अजित पवारांच्या या विधानानंतर तुम्ही एकेक मंत्र्यांची व नेत्यांची विधाने लक्षात घ्या त्यांना अप्रत्यक्ष दम दिले गेले. तुमची फाईल अजून निकालात निघाली नाही. तुमची केस कोर्टात आहे. तोंडाला लगाम लावा. त्यानंतर 15 जानेवारी रोजी अजित पवारांनी पुन्हा सांगितले की, माझ्याकडे भाजपच्या फार मोठ्या भ्रष्टाचाराची फाईल माझ्याकडे आली आहे. त्यानंतर अजित पवारांचा व शरद पवारांचा पक्ष एकत्र येत असल्याच्या बातम्या समोर आल्या. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजितदादांचा 28 जानेवारीला अपघात व्हावा हा केवळ योगायोग आहे की षडयंत्र आहे हे मी सांगू शकत नाही. या प्रकरणी तपास यंत्रणांनी खुलासा करण्याची गरज आहे. यासंबंधी आजपर्यंत महाराष्ट्र सरकारने, सरकारच्यावतीने किंवा केंद्र सरकारनेही निवेदन केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही निवेदन केले नाही. त्यामुळे दाल में कुछ तो काला है, असे भास्कर जाधव म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर