ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

वैदिक वेलनेस संकल्पनेवर चर्चा; 104 योगपटूंचा लक्षणीय सहभाग:योग-निसर्गोपचार शिबिराच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त कार्यक्रम‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन (डीसीपीई), अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने चिखलदरा येथे आयोजित योग-निसर्गोपचार उन्हाळी शिबिराच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय परिषद व खुल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. सर्वांचे प्रेरणास्थान, प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांच्या आशीर्वादाने ११ ते २१ मे या कालावधीत सुरू असलेल्या विशेष शिबिराअंतर्गत १५ व १६ मे रोजी आंतरराष्ट्रीय योगगुरू डॉ. अरुण खोडस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली हे दोन दिवसीय उपक्रम पार पडले. राष्ट्रीय परिषद व योगासन स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान श्री हव्याप्र मंडळाच्या सचिव डॉ. माधुरीताई चेंडके यांनी भूषवले. ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्रीनिवास देशपांडे, चिखलदरा नगराध्यक्ष शेख अब्दुल शेख हैदर, ज्येष्ठ समाजसेवक मो. अश्रफ तसेच मेळघाट वन्यजीव विभागाचे विभागीय वनाधिकारी अनंता डिगोळे उपस्थित होते. यावेळी भारतीय योग संस्थान, छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष व योगतज्ज्ञ डॉ. उत्तम काळवणे यांची विशेष उपस्थिती लाभली. ठाणे येथील योग व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. उल्का नातू यांनी प्रमुख वक्त्या म्हणून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे आद्य संस्थापक स्व. अंबादास पंत वैद्य व त्र्यंबक गुरुजी जोशी यांच्या प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने योगमय वातावरणात झाली. उद्घाटन सत्रानंतर ऑफलाइन व ऑनलाइन माध्यमातून एकूण २४ संशोधनपर पेपर सादर करण्यात आले. राष्ट्रीय परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ. शशिकांत येवतीकर, कोषाध्यक्ष, बृहन महाराष्ट्र योग परिषद होते. सहअध्यक्ष म्हणून डॉ. सतीश मोहोगावकर, टेक्निकल डायरेक्टर, महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन उपस्थित होते. परीक्षक म्हणून डॉ. विशाल खोडस्कर उपस्थित होते. राज्यभरातील योगतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक व योगसाधकांचा या परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समारोपीय व पारितोषिक वितरण समारंभ दुपारी ३.३० वाजता पार पडला. अध्यक्षस्थानी डॉ. श्रीकांत चेंडके, उपाध्यक्ष, श्री ह.व्या.प्र. मंडळ उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून मेळघाट-चिखलदरा मतदारसंघाचे आ. केवलराम काळे, नगरसेवक आल्हाद कलोती, गिरिजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल निंबेकर, अरुण सपकाळ तसेच आयटीआयचे प्राचार्य चोपडे उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय योगगुरू डॉ. अरुण खोडस्कर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उद्घाटन व समारोपीय सत्राचे सूत्रसंचालन प्रा. अर्चना देशपांडे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. प्रतीक पाथरे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सचिव डॉ. सुनिल लाबडे, संयोजक नितीन काळे व सहाय्यक संयोजक प्रवीण अनासाने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यासाठी प्रा. संदीप मांदळे, प्रा. सागर हाते, प्रा. प्रणय पवार, चंद्रशेखर ढोले, प्रा. सुषमा शिरभाते, प्रा. संपदा आगरकर तसेच योगशास्त्र विभाग व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. योग केंद्र, चिखलदरा येथील निसर्गरम्य वातावरणात पार पडलेल्या या सुवर्णमहोत्सवी उपक्रमांनी योग, आरोग्य, भारतीय संस्कृती आणि ज्ञानपरंपरेचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचवला. यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती. लवचिकता, शारीरिक क्षमतेचे प्रदर्शन १६ मे रोजी आयोजित खुल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेला विशेष प्रतिसाद लाभला. योगासन फिजीक फेडरेशन ऑफ इंडिया व बृहन महाराष्ट्र योग परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या स्पर्धेत विविध राज्यांतील स्पर्धक सहभागी झाले. महिला व पुरुष गटांमध्ये ८ ते १५, १५ ते २२, २२ ते ३०, ३० ते ४०, ४० ते ५५ आणि ५५ ते ७० वर्षे अशा विविध वयोगटांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या. एकूण १०४ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. योगासनातील लवचिकता, संतुलन, शारीरिक क्षमता व कलात्मक सादरीकरणाचे दर्शन घडले. प्रत्येक वयोगटातील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर