ब्रेकिंग न्यूज
⚡ Pune News: फटाक्यांवरून मध्यरात्री पुण्यात राडा, वडिलांना वाचवायला गेलेल्या लेकीसोबतच भयंकर घडलं, क्षणात रक… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल… ✦ ⚡ कटिंग चहा देखील महाग होणार! मदर डेअरीपाठोपाठ 2 कंपन्यांनी वाढवले दुधाचे दर, नवे दर आजपासून लागू ✦ ⚡ Cricket Rule : ना कॅच, ना रन आऊट, ना बोल्ड… अंपायरने भलत्याच कारणासाठी दिलं आऊट, क्रिकेटमधली सगळ्यात विचि… ✦ ⚡ Supriya Sule: “तुझ्याशिवायची पहिली भाऊबीज…” अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, ”आम्हा बह… ✦ ⚡ CRIME : आईने पोटच्या 24 वर्षाच्या पोराला संपवलं, कोल्ड ड्रिंकमधून झोपेच्या गोळ्या दिल्या अन्… एका गोष्टीस… ✦ ⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं… ✦ ⚡ पांडवदेवीच्या पावन भूमीत आज गोवर्धन यात्रेचा भक्तीमय जयघोष! ✦ ⚡ दुष्काळामुळे मेंढपाळ व्यवसाय आर्थिक संकटात, अचानक घसरले दर, सोलापूरमधील भीषण वास्तव, Video ✦ ⚡ CRIME : ब्लँकेटमध्ये गुंडाळून उजनी धरणात फेकलं, विवाहित महिलेच्या हत्येचं गुढ अखेर उकललं! पोलिसांनी 2 तासात…
SP News Maregaon

घरगुती गॅससाठी आता ‘ई-केवायसी’ अनिवार्य:दुर्लक्ष केल्यास कनेक्शन होऊ शकते रद्द, एजन्सीत न जाता घरबसल्या अशी पूर्ण करा प्रक्रिया

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


घरगुती गॅस (LPG) वापरणाऱ्या कोट्यवधी ग्राहकांसाठी केंद्र सरकारने ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास ग्राहकांना मिळणारी गॅस सबसिडी बंद होऊ शकते, इतकेच नव्हे तर गॅस कनेक्शन निलंबित होण्याचीही दाट शक्यता आहे. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता गॅस एजन्सीच्या रांगेत उभे राहण्याची गरज उरलेली नाही. ग्राहक आपल्या मोबाईलवरूनच ही पडताळणी मोफत पूर्ण करू शकतात. पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पारदर्शकता आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत सबसिडी पोहोचवण्यासाठी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे. ग्राहकांनी जर ही प्रक्रिया टाळली, तर त्यांना दरमहा मिळणारा ३०० ते ४०० रुपयांचा सबसिडीचा लाभ गमवावा लागेल. तसेच, नवीन सिलिंडर बुक करताना अडचणी येऊ शकतात किंवा कंपनीकडून डिलिव्हरी रद्द केली जाऊ शकते. सबसिडीवर होणार मोठा परिणाम ई-केवायसी पूर्ण न केल्यास ग्राहकांना सिलिंडरची संपूर्ण रक्कम भरावी लागेल. यामुळे प्रति सिलिंडर मिळणारा ३०० ते ४०० रुपयांचा सबसिडीचा फायदा ग्राहकांना गमवावा लागू शकतो. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तात्काळ आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. घरबसल्या ‘ई-केवायसी’ करण्याची सोपी पद्धत तुम्ही इंडेन (Indane), भारत गॅस (Bharat Gas) किंवा एचपी गॅस (HP Gas) यापैकी कोणत्याही कंपनीचे ग्राहक असाल, तर खालील चरणांचा वापर करून केवायसी करू शकता: १. ॲप डाउनलोड करा: गुगल प्ले स्टोअरवरून तुमच्या गॅस कंपनीचे अधिकृत ॲप आणि ‘Aadhaar FaceRD’ हे ॲप डाउनलोड करा.
२. लॉगिन: नोंदणीकृत मोबाईल नंबरद्वारे गॅस कंपनीच्या ॲपमध्ये लॉगिन करा.
३. प्रमाणीकरण: ॲपमधील ‘e-KYC’ किंवा ‘आधार प्रमाणीकरण’ (Aadhaar Authentication) या पर्यायावर क्लिक करा.
४. चेहरा स्कॅन: ‘FaceRD’ ॲपच्या मदतीने तुमचा चेहरा स्कॅन करून पडताळणी पूर्ण करा. दरम्यान, ज्यांना मोबाईलवर ही प्रक्रिया करणे शक्य नाही, ते आपल्या गॅस एजन्सीवर जाऊनही बायोमेट्रिक मशीनद्वारे किंवा फॉर्म भरून ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. केवायसी न केल्यास होणारे नुकसान सिलिंडर बुकिंगमध्ये अडथळे: तुमचे गॅस बुकिंग स्वीकारले जाणार नाही. सबसिडी मिळणार नसल्याने ग्राहकांना सिलिंडरची पूर्ण किंमत मोजावी लागेल. दीर्घकाळ केवायसी प्रलंबित राहिल्यास गॅस कनेक्शन कायमस्वरूपी निलंबित किंवा ब्लॉक केले जाऊ शकते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर