ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

अहिल्यानगरात भाजपच्या ताकदीसमोर राष्ट्रवादी बॅकफूटवर‎:राष्ट्रवादीला रायगडची जागा जाण्याची शक्यता असल्याने नगरची जागा जाऊ शकते भाजपकडे‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यातील स्थानिक स्वराज्य ‎संस्थांच्या 17 विधान परिषद‎ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली ‎आहे. राजकीय हालचालींना वेग‎ आला. 18 जून रोजी होणारे मतदान‎ आणि 22 जूनच्या मतमोजणीपूर्वी ‎”महायुती”मध्ये जागा वाटपाचा नवा ‎फॉर्म्युला निश्चित झाल्याचे‎ सूत्रांकडून समजते. महायुतीत ‎भाजप 12, शिवसेना 4 आणि ‎राष्ट्रवादीच्या वाट्याला ‎रायगड-रत्नागिरी- सिंधुदुर्ग ‎मतदारसंघाची एकमेव जागा ‎जाण्याची दाट शक्यता आहे, असे‎ झाले तर अहिल्यानगरची हक्काची‎ जागा भाजप स्वत:कडेच ठेऊ ‎शकते.‎ अहिल्यानगरची जागा भाजपकडे ‎जाण्यामागे वरिष्ठ पातळीवरील ‎महायुतीचे अंतर्गत राजकीय गणित ‎कारणीभूत ठरू शकते. महायुतीच्या‎ नव्या फॉर्म्युल्यानुसार सुनील तटकरे‎ हे त्यांचा हक्काचा बालेकिल्ला‎ पक्षाकडे ठेवण्यासाठी कसोशिने ‎प्रयत्न करतील.‎ राष्ट्रवादीला रायगडची एकमेव‎ जागा मिळाली तर दुसऱ्या जागेसाठी ‎‎पाहिजे तसा आग्रह करता येणार‎ नाही. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित‎ पवार यांच्यानंतर या जागेसाठी हट्ट ‎‎धरणारा किंवा भाजपला थेट‎ आव्हान देणारा वजनदार नेता सध्या ‎‎राष्ट्रवादीकडे नाही. त्यामुळे‎ रायगडच्या बदल्यात‎ अहिल्यानगरवरचा दावा सोडणे ‎‎राष्ट्रवादीला भाग पडू शकते. ‎भाजपने ऐनवेळी जर फॉर्म्युल्यात‎ बदल करून राष्ट्रवादीला जागा‎ वाढवून देण्याचा निर्णय घेतल्यास ‎‎अहिल्यानगरची जागा मिळण्याची ‎‎आशा राष्ट्रवादीचे पदाधिकारी व ‎‎कार्यकर्त्यांना आहे.‎ फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्यास शिवसेनेचीही साथ‎ भाजपसोबत महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचीही चांगलीच ताकद‎ वाढली आहे. त्यांचे शेवगाव नगर परिषद, नेवासे नगर पंचायतीत त्यांचा‎ नगराध्यक्ष आहे. महायुतीतील संभाव्य फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्यास ‎शिवसेना शिंदे गटाची ताकदही भाजपच्या पाठिशी राहण्याची शक्यता आहे. या‎ स्पष्ट आकडेवारीमुळे राष्ट्रवादी येथे पूर्णपणे बॅकफूटवर गेली असून, भाजपचा ‎विजय अधिक सुकर मानला जात आहे. 461 पैकी सर्वाधिक‎
199 मतदार भाजपचे‎ गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार‎गट) ताब्यात असलेली ही जागा आता भाजप ‎स्वतःकडे खेचून घेण्याच्या तयारीत आहे. त्यामागे ‎कारणही तसे भक्कम आहे. जिल्ह्यात 11 नगर‎परिषदा, 4 नगर पंचायती आणि छावणी परिषद‎ मिळून एकूण 461 मतदार आहेत. यात एकट्या‎ भाजपचे हक्काचे 199 भाजपचे नगरसेवक‎ मतदार आहेत. यात संगमनेर सेवा समितीचे 33 आणि राहुरीतील जनविकास आघाडीचे 17 नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला तर हा आकडा‎ 249 वर जातो. त्यानुसार भाजपचा उमेदवार स्वबळावरही सहज विधान परिषदेवर जाईल.‎ त्यामुळे कागदावर राष्ट्रवादीच्या तुलनेत भाजपच ‎भक्कम दिसत आहे.‎ शब्द पाळला जाणार की‎
निष्ठावंतांचा पुन्हा “त्याग”‎ जिल्ह्यात राजकीय परिस्थिती पाहता ‎भाजपचे उमेदवार निवडून‎ आणण्यासाठी वेळोवेळी अनेक ‎तडजोडी करण्यात आल्या.‎ याआधीच्या निवडणुकांत मुख्यमंत्री ‎देवेंद्र फडणवीस यांनी शब्द देऊन ‎भाजप तसेच मित्रपक्षांच्या‎ उमेदवारांना निवडून आणले.‎ त्याप्रमाणे शब्दाला मान देणाऱ्या‎ नेत्यांना संधी दिली गेली. नुकतेच ‎विवेक कोल्हे यांना विधान परिषदेवर‎ पाठवण्यात आले. आता या जागेवर‎ भाजपने उमेदवार द्यायचे ठरल्यास ‎शब्द पाळला जाणार की निष्ठावंतांना ‎पुन्हा त्याग करावा लागणार हे पाहणे‎ औत्सुक्याचे ठरणार आहे.‎‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर