ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

मुख्यमंत्र्यांचे कार्यालय संभाजीनगरच्या पाणी योजनेचा आता पाठपुरावा करणार:मुंबईतील उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून पाणीप्रश्नांवर मोठा निर्णय

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेतील रखडलेल्या कामांमुळे निर्माण झालेला जनक्षोभ लक्षात घेता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट ‘वॉर रूम’मधून प्रशासनाला लगाम घालण्यास सुररुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेतली. पायाभूत सुविधांच्या या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी केवळ सूचना देऊन न थांबता, समन्वयाचा अभाव असलेल्या यंत्रणांना स्पष्ट इशारा दिला. २५ वर्षांपासून संभाजीनगरात पाणी टंचाई आहे. २१ वर्षापूर्वी जाहीर पाणी पुरवठा योजना अजूनही अपूर्ण आहे. सूत्रांनुसार, संभाजीनगर मनपा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यातील समन्वयाअभावी प्रकल्पांची गती मंदावली आहे. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत उभय यंत्रणांना ‘वन-पॉइंट’ समन्वयाचे निर्देश दिले आहेत. एकमेकांकडे जबाबदारी ढकलण्याऐवजी, प्रकल्पातील तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करून पाणीपुरवठा सुरळीत करा असे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, या प्रकल्पाच्या कामात आता मुख्यमंत्र्यांचे कार्यालय स्वतः वैयक्तिक लक्ष घालणार आहे. ठेकेदारांना इशारा; कामाचा दर्जा महत्त्वाचा पायाभूत सुविधांची कामे कासवगतीने करणाऱ्या ठेकेदारांना मुख्यमंत्र्यांनी थेट काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला. ठेकेदारांच्या आर्थिक क्षमतेपेक्षा त्यांच्या कामाच्या गतीवर मुख्यमंत्र्यांनी सवाल उपस्थित केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर