ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

तांत्रिक तपासाच्या जोरावर अकोला जिल्हा गुन्हेगारीमुक्त होणर- पाटील:महानिरीक्षक डॉ. महेश पाटील यांचे तपासाबाबत नवे निर्देश‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी | अकोला अमरावती परिक्षेत्राचे नवनियुक्त विशेष पोलिस महानिरीक्षक (आयजीपी) डॉ. महेश पाटील यांनी मंगळवारी अकोला जिल्हा पोलिस दलाच्या वार्षिक कामगिरीचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी केवळ गुन्ह्यांच्या तपासाची माहिती घेतली नाही, तर अकोला जिल्हा गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी व्हिजन २०२६ अंतर्गत आधुनिक तांत्रिक तपासावर भर देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या आढावा बैठकीला पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक उपस्थित होते. हे आहे तपासात तांंत्रिक पुराव्यांचे महत्त्व पोलिस मुख्यालयातील बैठकीत डॉ. महेश पाटील यांनी तपासातील त्रुटी दूर करण्यासाठी ‘सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन’वर भर दिला. केवळ साक्षीदारांवर विसंबून न राहता, डीएनए, सायबर फॉरेन्सिक आणि सीसीटीव्ही फुटेज यांसारख्या तांत्रिक पुराव्यांची साखळी मजबूत केल्यास दोषसिद्धीचे प्रमाण वाढण्यास मदत होईल, असे पोलिस महानिरिक्षक पाटील यां नी सांगितले. अंमली पदार्थ मुक्त अकोल्याचा संकल्प तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी व ड्रग पेडलर्सची साखळी मोडून काढण्यासाठी विशेष मोहीम, पथकांचे सक्षमीकरण करण्यावर या बैठकीत एकमत झाले. सायबर गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी सायबर सेलला अद्ययावत होणार. मुख्यालयाची पाहणी व सीसीटीएनएसचा आढावा महानिरीक्षकांनी पोलीस मुख्यालयातील शस्त्रागार, नियंत्रण कक्ष आणि सीसीटीएनएस प्रणालीची प्रत्यक्ष पाहणी केली. पोलिसांच्या प्रतिसादाचा वेळ कमी करण्यासाठी आधुनिक नियंत्रण कक्षाची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर