ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

जागतिक महासागर दिन विशेष‎:महासागर खेचतोय मान्सूनचे ढग, पावसाची 8 टक्के तूट शक्य; 10 वर्षांत तिसऱ्यांदा कमी पाऊस‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महासागरातील तापमानातील बदलानुसार‎पर्जन्यमानात मोठे बदल पहायला मिळतात.‎मागील दहा वर्षातील पर्जन्यमान पाहता,‎अहिल्यानगर जिल्ह्यात दर दोन ते चार‎वर्षांनी पर्जन्यमान कमी झाल्याचे दिसून‎येते. यापूर्वी २०२३ मध्ये कमी पाऊस झाला‎होता. आता पुन्हा २०२६ मध्ये पॅसिफिक‎महासागराचे तापमान‎ ०.५ अंशापेक्षा अधिक वाढल्याने,‎ एलनिनोचा प्रभाव निर्माण झाला. त्यामुळे‎ अहिल्यानगरसह भारतातील मान्सूनचे‎ ढग तिकडे ओढले जाऊन आठ ते दहा‎टक्के कमी पाऊस होण्याचा अंदाज‎ आहे. मे महिन्यात, समुद्रातील तापमान‎२९.८ अंश सेल्सिअस होते.‎ पॅसिफिकमध्ये तापमान वाढून, कमी दाब‎निर्माण झाला असल्याने, विषुवृत्तीय‎क्षेत्रातील हवेच्या प्रवाहाची दिशा बदलत‎आहे. परिणामी जे वारे भारतासह‎अहिल्यानगरकडे ओलावा घेऊन‎यायला हवे होते, ते पॅसिफिकच्या‎महासागराकडे खेचले जात आहेत.‎त्यामुळे हिंद महासागरातील मान्सून‎वाऱ्याची तागद व आर्द्रता कमी होऊन‎पर्जन्यमानावर परिणाम होऊन एलनिनोचे‎संकट गडद झाले आहे.‎ एलनिनोचा प्रभाव असला तरी‎शेतकऱ्यांनी पीक नियोजन कसे करावे,‎यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने‎मार्गदर्शक अहवाल तयार केला आहे.‎एल निनो पॅसिफिक महासागरात उष्णता‎वाढवून हिंद महासागरातील मान्सून‎वाऱ्यांची खेचण्याची ताकद कमी करतो,‎ज्यामुळे भारताचे मान्सून चक्र‎विस्कळीत होऊ शकते. जिल्ह्याचा‎विचार करता, मागील दहा वर्षांत २०१५‎मध्ये कमी पाऊस झाल्याने दुष्काळी‎स्थिती निर्माण झाली होती. तसेच २०१८‎व २०२३ मध्येही तिव्र टंचाईचा सामना‎करावालागला. परंतू, दर दोन ते तीन‎वर्षानंतर पुन्हा दमदार पाऊस झाल्याचे‎आकडेवारीवरून स्पष्ट होते.‎ पाऊस कमी पडेल, तुम्ही हे करा!‎ पावसाचे आगमन उशिरा झाल्यास घाईने पेरणी करणे टाळावे,‎किमान ८०-१०० मि.मी. पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये.‎जमीनीचे तापमान ४० ते ५० अंशावर आहे. या काळात पेरणी‎केल्यास उगवन कमी होते. त्यामुळे जमिनीचे तापमान किमान १८‎ते २५ असायला हवे. जमिनीच्या खोलीनुसार पिकांची निवड‎करा; हलक्या जमिनीत बाजरी, मटकी, हुलगा तर मध्यम ते खोल‎जमिनीत तूर, सूर्यफूल, रब्बी ज्वारी यांसारख्या पिकांचे नियोजन‎करावे, असा सल्ला आपत्कालीन पीक व्यवस्थापनात दिला आहे.‎ पाणी आणि ओलावा व्यवस्थापन‎ पावसाचा खंड पडल्यास पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सरी-वरंबे,‎बंदिस्त वाफे आणि मुलस्थानी जलसंधारणाचे उपाय अवलंबावेत.‎जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पिकांच्या दोन ओळींत‎पाचट, काडीकचरा यांसारख्या अवशेषांचे आच्छादन वापरावे,‎ज्यामुळे २५ ते ३० मि.मी. ओलाव्याची बचत होते.‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर