ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

कमी भावात कांदा खरेदी करून साठेबाजी सुरू:निधी मिळत नसेल तर महायुतीतून बाहेर पडा; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा अब्दुल सत्तारांना थेट सल्ला

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विविध मुद्द्यांवरून महायुती सरकारला धारेवर धरले असून, शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांना थेट सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आंतरराष्ट्रीय कृषी करार शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारे असून, सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची लूट करून कमी भावात कांदा खरेदी करत साठेबाजी सुरू आहे, असा गंभीर आरोप वडेट्टीवारांनी केला. तसेच, महायुतीमधील अंतर्गत वादावर बोट ठेवत, जर स्थानिक पातळीवर निधी मिळत नसेल आणि कोंडी होत असेल तर अब्दुल सत्तारांनी महायुतीतून बाहेर पडावे; कारण जो भाजपसोबत जातो त्याला बुडवण्याचे काम भाजपकडून नेहमीच होते, असा टोला वडेट्टीवारांनी लगावला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो अनेक देशांसोबत कृषी करार केला आहे तोच शेतकऱ्यांना बुडवणारा आहे. या कराराची समीक्षा झाली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना खड्यात घालण्याचे काम केले आहे.तो करार रद्द होईपर्यंत शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारू शकत नाही, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे सुद्धा हेच हाल सुरू आहेत. शेतकऱ्यांचे हाल सुरू आहे, त्यांच्याकडून कमी भावात कांदा विकत घेत त्याचा साठा करण्यात आला आहे. सरकारमध्ये एकाच पक्षाच्या हाती सत्ता विजय वडेट्टीवार म्हणाले की, अब्दुल सत्तारांना निधी दिला जात नसेल तर त्यांनी महायुतीसोबत राहू नये. जो भाजपसोबत गेला त्याला बुडवण्याचे काम भाजपकडून होते हे सांगण्याचा प्रयत्न जर त्यांच्याकडून होत असेल तर निर्णय काय घ्यायचा हे त्यांनी ठरवावे. या सरकारमध्ये अंतर्गत वाद सुरू आहे. एका पक्षाच्या हाती सत्ता असल्याने इतर पक्षांना त्याचा त्रास होत आहे, म्हणून ते वेदना मांडत आहेत. ..तर शेतकरी पीकच घेऊ शकणार नाही विजय वडेट्टीवार म्हणाले की, शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांचे कर्जमाफ झाल्यानंतर वरचे पैसे भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे आहेत कुठे? जुने कर्ज असल्याने त्यांना नवे लोन सुद्धा मिळालेले नाही. दोन लाखाच्या आतील शेतकऱ्यांनी पैसे न भरल्याने यावर्षीचा हंगाम अडचणीत आला, निर्णय आज झाला तरी पैसे खात्यात का पडतील. त्याला किती कालावधी लागेल. खरीप हंगामानंतर पैसे मिळाले तर ते पीकच घेऊ शकणार नाही. कारण त्यांच्याकडे पैसेच नाही. कर्जमाफी हा केवळ दिखावा आहे, याचा शेतकऱ्यांना थेट काहीही फायदा नाही.प्रोत्साहन निधी आम्ही घेतलेला निर्णय आहे. त्या निर्णयावर हे सरकार 4 वर्षाने अंमजबजावणी करत आहे, यातून त्यांच्या शेतकऱ्यांबद्दल काय भावना आहेत या समजतात. गडचिरोलीतील दारू बंदी हटवली पाहिजे विजय वडेट्टीवार म्हणाले की, चंद्रपूर जिल्ह्यातील दारू बंदी मी उठवली. जगात आणि देशात दारु सुरू आहे.
ज्या राज्यांनी दारू बंदी केली त्या राज्यांनी पुन्हा दारू सुरू केली आहे. पुण्यात बनावट दारु पिल्याने अनेक जणांचा जीव गेला, तो आकडा दाबला जात आहे. गडचिरोलीत आदिवासी लोकांना मोहाच्या फुलांचा अर्क काढून पिण्याचा अधिकार आहे. इतरांसाठी तिथे दारू बंदी आहे. गडचिरोलीमध्ये औद्यौगिक वसाहत वाढत आहे. दारू बंदीमुळे काय लोकं व्यसनमुक्त होतो का? सर्व प्रगत देशात लिकर मिळते त्यामुळे धर्मराजबाबा आत्राम यांच्या गडचिरोलीतील दारू बंदी हटवली पाहिजे या मागणीला माझे समर्थन आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर