ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

कर्जमाफीच्या अटींवरून रोहित पवारांचा हल्लाबोल:29 जूनला छत्रपती संभाजीनगरात महाआंदोलनाचा इशारा, विश्वासघात झालाय, आम्ही सरकारला सोडणार नाही!

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील अटी-शर्तींवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी या मुद्यावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून, ही कर्जमाफी योजना पूर्णपणे फसवी आहे,” असा घणाघाती आरोप करत रोहित पवारांनी येत्या २९ जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीच्या वतीने महाआंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. गिरीश महाजनांनी पंढरपूरमध्ये दिलेला शब्द पाळला नाही रोहित पवार यांनी नुकत्याच पंढरपूर येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून केलेल्या ‘अन्नत्याग आंदोलना’चा संदर्भ देत सरकारवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “पंढरपूरमध्ये २६ शेतकऱ्यांसह आम्ही अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यावेळी सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः फोन करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती आणि २२ तारखेपूर्वी तातडीने बैठक घेऊन शेतकऱ्यांचे मुद्दे ऐकण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सरकारने तो शब्द पाळला नाही. हा थेट शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे.” ४४ लाख शेतकऱ्यांवर अन्याय; ही योजना केवळ नावापुरती सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना रोहित पवार म्हणाले, कर्जमाफी योजनेत इतक्या जाचक अटी टाकण्यात आल्या आहेत की, तब्बल ४४ लाख शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. राज्यातील ५५ लाख शेतकऱ्यांपैकी फक्त काही मोजक्याच शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. ही योजना केवळ नावापुरती कर्जमाफी असून, प्रत्यक्षात अनेक अटी लावून शेतकऱ्यांना बाहेर ठेवण्याचे काम सरकारने केले आहे. सरकार केवळ फसवे आकडे दाखवून जनतेची दिशाभूल करत आहे. २९ जूनला संभाजीनगरात रणशिंग फुंकणार पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला धारेवर धरताना रोहित पवार यांनी आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. “येत्या २९ जूनला छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने एक विशाल आंदोलन करण्यात येईल.” “आम्ही सरकारला ३० तारखेपर्यंतचा वेळ देत आहोत. जर सरकारने कर्जमाफीतील जाचक अटी मागे घेतल्या नाहीत, तर हे आंदोलन संपूर्ण राज्यभर अधिक तीव्र केले जाईल. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे, आम्ही या सरकारला सोडणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, नुकत्याच लागलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांच्या निकालांवरूनही रोहित पवारांनी महायुतीला आणि विशेषतः भाजपला लक्ष्य केले. “नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार विजयी झाला आणि महायुतीचा (शिंदे गटाचा) अधिकृत उमेदवार पराभूत झाला, हा एकनाथ शिंदेंसाठी मोठा धक्का आहे.” “या निकालावरून मित्रपक्षांमध्ये समन्वयाचा किती अभाव आहे, हे स्पष्ट दिसते. भाजप कोणाचाही खरा मित्र नाही. ते केवळ स्वतःच्या फायद्यासाठी राजकारण करतात, सत्ता मिळवण्यासाठी वेगवेगळे डाव खेळतात आणि सोबत असलेल्या मित्रपक्षांनाच राजकीयदृष्ट्या कमकुवत करून संपवतात.” रोहित पवार यांनी सरकारला कर्जमाफीतील अटींसोबतच इतर अनेक मुद्द्यांवरून घेरले. “राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ जाहीर केलेला नाही, शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळालेली नाही आणि अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत,” असे ते म्हणाले. “२९ जूनचे आंदोलन ही फक्त एक सुरुवात आहे. जोपर्यंत सरकार आपला निर्णय बदलत नाही, तोपर्यंत हा संघर्ष आणि आंदोलन थांबणार नाही,” अशी ठाम भूमिका रोहित पवार यांनी मांडली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर