ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

संभाजीनगर पंचायत समितीचे सभापतिपद खुल्या गटासाठी:सभापती-उपसभापती निवडीसाठी 10 मार्चला सभा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष लागून असलेल्या सभापती आणि उपसभापती निवडीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलेल्या आदेशानुसार, जिल्ह्यातील सर्व ९ पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवडीसाठी १० मार्च २०२६ रोजी दुपारी २:०० वाजता संबंधित पंचायत समितीच्या सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. या निवडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून सभापतिपदाचे आरक्षणही निश्चित करण्यात आलेले आहे. सभापती आणि उपसभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज सभेच्या वेळेपूर्वी दोन तास आधी स्वीकारले जातील. सभेसाठी एकूण सदस्यांच्या १/३ गणपूर्ती असणे आवश्यक आहे. प्रथम सभापतिपदाची निवड करण्यात येईल आणि त्यानंतर लगेच उपसभापतिपदासाठीची निवडणूक प्रक्रिया पार पडेल. जिल्हाधिकाऱ्यांनी या निवडीसाठी कडक सूचना दिल्या असून पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्याचेही आदेश दिले आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर