ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

नातेवाईकांकडे जेवणाचा बहाणा अन् थेट मंदिरात लग्न:विवाहाला विरोध करताच अल्पवयीन नवरीला मारहाण, कुरुंदा पोलिसांत पतीसह 12 जणांवर गुन्हा दाखल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कुरुंदा पोलिस ठाण्यांतर्गत एका गावातून धोंडे जेवणाला पाहूण्यांकडे जाण्याचे सांगत अल्पवयीन मुलीस थेट सोलापूर येथे नेऊन विवाह लावून दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी बारा जणांवर मंगळवारी ता. 2 रात्री गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये सहा महिलांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक अल्पवयीन मुलगी लहानपणापासूनच तिच्या आजोळी शिक्षणासाठी राहात होती. ता. 22 मे रोजी त्या मुलीच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने मुलीस व तिच्या आजीला वसमत येथे पाहूण्यांकडे धोंडे खायला जाऊन येऊ असे सांगत दोघींना सोबत घेतले. वसमत येथे गेल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा दोन महिला व एक पुरुष त्यांच्या सोबत आला. त्यानंतर त्या सर्वांनी त्या मुलीस व तिच्या आजीला तुळजापूर येथेही धोंडे जेवण करू व देवदर्शन करून येऊ असे सांगत तुळजापूर येथे नेले. दरम्यान, त्या ठिकाणी या महिलांनी अक्षय कोकणे नावाच्या तरुणाशी व त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. त्यानंतर मुलगी सज्ञान असल्याचे दाखविण्यासाठी मुलीचे बनावट आधारकार्ड तयार केले. त्या ठिकाणी तयार केलेले आधारकार्ड दाखवून त्यांनी त्या मुलीचा एका मंदिरात नेऊन अक्षय सोबत विवाह लाऊन दिला. विवाहानंतर अक्षय याने मुलीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला मात्र मुलीने विरोध केल्यानंतर अक्षय याने मुलीस मारहाण केली. दरम्यान, त्या मुलीच्या आई, वडिलांनी मुलीस गावाकडे पाठविण्यासाठी तिच्या आजीसोबत कुरुंदा येथे संपर्क साधला. मात्र आजीकडून योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांना शंका आली. त्यांनी कुरुंदा येथे येऊन चौकशी केली असता मुलीचा सोलापूर येथे विवाह लावल्याचे स्पष्ट झाले. त्या मुलीच्या वडिलांनी अक्षय याच्याशी संपर्क साधून खरा प्रकार सांगितल्यानंतर अक्षय याने त्यांच्याकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. या प्रकरणी त्या मुलीच्या वडिलांनी सोलापूर एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र मुळ प्रकार कुरुंदा येथे घडल्याने सोलापूर पोलिसांनी तक्रार कुरुंदा पोलिसांकडे वर्ग केली. त्यावरून कुरूंदा पोलिसांनी अक्षय कोकणे याच्यासह त्याची आई, भाऊ, वडिल एक महिला(रा. सोलापूर) यांच्यासह वसमत येथील तीन व कुरुंदा येथील एक महिला अशा एकूण 12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, उपनिरीक्षक कारामुंगे पुढील तपास करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर