ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

एसटीच्या विशेष मोहिमेत आठ स्थानकावर 69 वेळा तपासणी:578 वाहनांवर कारवाई; 5 लाखांचा दंड केला वसूल‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बसस्थानक परिसरात होणाऱ्या अवैध खासगी प्रवासी वाहतुकीला चाप लावण्यासाठी एसटी महामंडळाने राबवलेल्या मोहिमेत ४ लाख ९४ हजार ९०० रुपये दंड आकारण्यात आला. एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम करणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात अकोला शहर व ग्रामीण वाहतूक पोलिसांच्या मदतीने नागपूर विभागातील सुरक्षा व दक्षता शाखेने ५ ते १५ जूनपर्यंत मोहीम राबवली. मोहिमेत ५७८ वाहनांवर कारवाई करण्यात आली. बसस्थानकाच्या आवाराच्या भिंतीला लागूनच खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसेस उभ्या करण्यात येतात. जुना बस स्टँडच्या (क्रमांक १) बाहेर १०-सीटर वाहने एका रांगेत उभी असतात. दरम्यान, एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अवैध प्रवासी वाहतुकीमुळे महामंडळाच्या उत्पन्नाला मोठा फटका बसत असल्याचे वारंवार निदर्शनास आणून दिले आहे. त्यानंतर मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी तथा पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या निर्देशानुसार ५ ते १५ जूनदरम्यान विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत नागपूर प्रदेशाचे वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकारी धम्मरत्न डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा निरीक्षक महेश ठाकरे, सहायक सुरक्षा उर्वरित पान ४ या कायद्यान्वये कारवाई बसस्थानक परिसरात अवैध खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर एसटी महामंडळाने मोटार वाहन कायद्याच्या कलम ६६(१), १२२, १७७, १९२(१), १९४(अ), २३९ अंतर्गत कारवाई केली. बसस्थानक परिसरातील २०० मीटर नो-पार्किंग झोनचे उल्लंघन करताना आढळलेल्या वाहनधारकांना दंड आकारण्यात आला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर