ब्रेकिंग न्यूज
पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…
SP News Maregaon

महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर:बंडखोरी करत अर्ज दाखल करणाऱ्यांनी माघार घ्यावी, रवींद्र चव्हाण यांची विनंती

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र, असे असूनही महायुती म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढवू आणि जास्तीत जास्त जागा जिंकू असे महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर महायुतीने संयुक्त पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले, आपल्या सर्वांना माहीत आहे विधान परिषदेच्या निवडणुका ज्या 18 तारखेला होऊ घातलेल्या आहेत, त्यात एक पोटनिवडणूक आहे, जी नागपूरची आहे. आणि 16 विधानपरिषदेच्या असणाऱ्या या निवडणुका आणि या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात एनडीएचे सरकार अतिशय चांगल्या पध्दतीने काम करताना दिसत आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई. या तिघांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे सरकार हे अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकरी, कष्टकरी आणि या सगळ्यांसाठी हितावह असल्याचे निर्णय हे घेताना दिसत आहे. अनेक ठिकाणी अर्ज मागे घेतले जातील पुढे बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले, विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये या सर्व केंद्रीय नेते मंडळी आणि महाराष्ट्रातील नेते मंडळी, या सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला की महायुतीमध्ये या सर्व निवडणुका लढल्या गेल्या पाहिजेत आणि म्हणून आपण पाहिले असेल की या सगळ्या जागांचे वाटप अतिशय चांगल्या पद्धतीने कसे होऊ शकते याचा निर्णय गेल्या काही दिवसात घेतला आहे. 1 तारखेला सर्व ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. 4 तारखेला अर्ज मागे घेण्याची वेळ आहे आणि अनेक ठिकाणी अर्ज मागे घेतले जातील. या निवडणुकांमध्ये मतदान जे आहे, त्या त्या ठिकाणच्या मतदारांची जी सूची आहे ती आयोगाने जाहीर केली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक चांगला मेसेज जाणे महत्त्वाचे होते. या निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात झाल्या पाहिजेत आणि सगळ्या जागांवर महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील अशी अपेक्षा आपण करू. या साठी काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री व नेते मंडळींची महत्त्वाची बैठक पार पडली. आता अधिकृत महायुतीचे उमेदवार कोण? हे जाहीर करण्याचे निर्देश कालच्या बैठकीत देण्यात आले आहेत. ते आज आपण घोषित करणार आहोत, अशी माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली आहेत. तसेच जे बंडखोरी करत अर्ज भरले असतील त्यांनी अर्ज मागे घ्यावे अशी विनंती देखील चव्हाण यांनी केली आहे. महायुतीचे उमेदवार कोण? सुनील तटकरे काय म्हणाले? पुढे बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुनील तटकरे म्हणाले, प्रत्येक पक्ष आपापली मते मांडत असतात. परंतु, ज्या पद्धतीने देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जगभरात भारताचे सामर्थ्य वाढत आहे, अशा वेळेला एनडीए देशातही आणि राज्यातही मजबूत असली पाहिजे. अमित शहा यांचे सर्व घटक पक्षाकडे लक्ष असते. अशा या भूमिकेतूनच या सर्व जागा आम्ही महायुती म्हणून एकत्र लढणार आहोत. काल आमची चर्चा झाली आणि जिथे जिथे ज्या पक्षाचे जागा अधिक आल्या आहेत, त्यानुसारच उमेदवारी देण्यात आली आहे. अर्ज मागे घेण्याचा दिवस उद्या आहे, मात्र त्याची प्रक्रिया आजपासूनच सुरू झाली आहे. बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांच्या कार्याचा सन्मान केला जाईल- राहुल शेवाळे शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे यावेळी बोलताना म्हणाले, ही निवडणूक आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढवत आहोत. जागावाटपचा जो निर्णय आहे त्यानुसारच आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. आम्हाला विश्वास आहे की 17 ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी होतील. शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे यांनी सर्व जे अधिकृत उमेदवारांच्या व्यतिरिक्त जे इतर उमेदवारांनी अर्ज भरले आहेत त्या सर्व उमेदवारांसोबत चर्चा केली आहे. ज्यांनी ज्यांनी बंडखोरी करत अर्ज भरला आहे त्यांच्या कार्याचा सन्मान केला जाणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर