ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

अकोला पोलिस दलातील सेवानिवृत्त अधिकारी, अंमलदारांचा केला सत्कार

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जिल्हा पोलीस दलातर्फे मे २०२६ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचा सत्कार सोहळा नुकताच अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. हा कार्यक्रम सोमवारी (दि. १) सकाळी ११ वाजता येथील पोलिस अधीक्षक कार्यालयातील विजय हॉलमध्ये घेण्यात आला. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात मे २०२६ मध्ये अकोला पोलिस घटकातून सेवानिवृत्त झालेले एकूण १० अधिकारी व अंमलदारांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यामध्ये पोलिस उपनिरीक्षक सुनील भटकर, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक सुनील सोयाम, महिला सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक चित्रलेखा आंभोरे, तसेच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सूरज मंगरुळकर, किशोर भेंडे, अरुण काकड, संजय मथने, रमेश बलखंडे आणि पोलीस हवालदार संतोष नेवारे व सुभाष दंदी यांचा समावेश आहे. या सत्कार सोहळ्याला सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व अंमलदारांचे कुटुंबीय उपस्थित असल्याने कार्यक्रमात अत्यंत आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. सत्कारमूर्तींनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रदीर्घ सेवेबद्दल समाधान व्यक्त केले. अशा प्रकारचा सन्माननीय सोहळा आयोजित केल्याबद्दल पोलिस प्रशासनाचे विशेष आभार मानले. यावेळी पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सर्व सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांच्या परिवाराची विचारपूस केली. निवृत्तीनंतर सर्वांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, आवडते छंद जोपासावेत आणि कुटुंबाला पुरेसा वेळ द्यावा, असा मोलाचा सल्ला दिला. सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यशस्वितेसाठी राखीव पोलिस निरीक्षक व त्यांच्या पथकाने विशेष परिश्रम घेतले. पोलिस हवालदार गोपाल मुकुंदे यांनी सूत्रसंचालन करत आभार मानले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर