ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

वादळाने केळीचे पीक उद्ध्वस्त; घरांवरील पत्रे गेली उडून:जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्याला बसला वादळी पावसाचा तडाखा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दानापूर परिसरात सोमवारी सायंकाळी सात वाजेनंतर आलेल्या जोरदार वादळी पावसामुळे केळीच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा अक्षरश: झोपल्या आहेत. दानापूर परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांवरील टिनाचे पत्रे उडून गेले आहेत. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तेल्हारा तालुक्यातील दहीगाव येथे अल्पभूधारक शेतकरी प्रमोद गुणवंत अवताडे यांच्या घराला या वादळाचा मोठा फटका बसला असून, त्यांच्या घरावरील छप्पर लोखंडी अँगलसह उडून गेले आहे. या घटनेत घरातील अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू आणि इतर साहित्याचे प्रचंड नुकसान झाले असून, त्यांच्या कुटुंबासमोर जगण्याच्या अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अकोट ८.३ तेल्हारा ८.० बाळापूर ८.७ पातूर १०.४ अकोला ८.९ बार्शीटाकळी ९.९ मूर्तिजापूर ९.७ एकूण ९.१ सर्वसामान्यांचे प्रचंड नुकसान याव्यतिरिक्त, तेल्हारा शहरातील उंबरकर नगर परिसरातील एका गोदामावरील पत्रे या वादळी वाऱ्यामुळे उडून गेले आहेत. अचानक आलेल्या या भयंकर वादळामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्यांनी जीवनावश्यक वस्तूंची साठवणूक करुन ठेवली आहे. या नैसर्गिक संकटामुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. सर्व नुकसानग्रस्तांना शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर