ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

गांधी ग्राम येथे कावड पालखीसाठी रॅम्पची रुंदी वाढणार:रेलींगची सुविधा, शिवभक्त, जिल्हाधिकारी, पाेलिस अधीक्षकांकडून संयुक्त पाहणी‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


यंदा होणाऱ्या कावड व पालखी उत्सवाच्या पृष्ठभूमीवर मंगळवारी सार्वजनिक कावड व पालखी उत्सव समिती, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, महसूल विभागाने गांधी ग्राम येथील पूर्णा नदीवरील सुविधांची पाहणी केली. शिवभक्तांनी रॅम्पची रुंदी वाढवणे, दोन हैद बांधणे, दोन्ही बाजूला रेलिंग लावण्यासह अन्य मागण्या केल्या. यावर सर्व सरकारी यंत्रणांनी कामे पूर्ण करण्याची ग्वाही दिली. तसेच पूर्णा नदीवरील घाटाची आवश्यक दुरूस्ती, तसेच स्वच्छता कामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले. अकोल्यातील राजराजेश्‍वर मंदिराच्या कावड-पालखी सोहळ्याला ७७ पेक्षा जास्त वर्षांची परंपरा आहे. गांधी ग्राम येथील पूर्णा नदीतील जल घेऊन शिवभक्त ते राजराजेश्वराला अर्पण करतात. शिवभक्त खांद्यावर कावड घेत रात्रभर पायी चालत येतात. दरम्यान सार्वजनिक कावड व पालखी उत्सव समितीद्वारे जिल्हाधिकारी वर्षा मिना यांना १ जून रेजी निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची दखल घेत मंगळवारी पूर्णा नदी घाटाची पाहणी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा मिना, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, समिती अध्यक्ष राजेश भारती, अॅड. पप्पु मोरवाल आणि विठ्ठल गाडे आदी मान्यवर उपस्थित होते. रस्ते, पायऱ्यांची रेलिंग, विद्युत पुरवठ्याची व्यवस्था करा {प्रत्यक्ष घाटात आणि नदीपात्रात उतरून पाहणी करण्यात आली. येणाऱ्या श्रावण मासात उद्भवणाऱ्या समस्येची चर्चा करून अपूर्ण पुल, तुटलेला घाट, अरुंद रस्ता, पायऱ्याची रेलींग लायटींग ची व्यवस्था ह्यावर तोडगा काढून कामे अधिकऱ्यांकडून देण्यात आले. {नॅशनल हायवे अॅथोरीटी चे अधिकारी हे यांनी गतिशिलतेने काम करावे जेणेकरून शिवभक्तांना इजा होणार नाही. कामांअभावी दुर्घटना घडल्यास संबंधितावर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न होणार अखेरच्या श्रावण सोमवारच्या पूर्वसंध्येला अकोल्यापासून १५ कि.मी. अंतर गांधीग्रामकडे शिवभक्त निघतात. रात्रभर कावडमध्ये पूर्णा नदीचे पाणी भरतात. पहाटेच अकोल्याकडे पुन्हा निघतात. शिवभक्त सकाळी राजेश्वर नगरीत पोहोचल्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ होतो. रात्री मिरवणुकीचा समारोप होतो. त्यामुळे हा एकाप्रकाराचा विक्रम असून, यंदा गीनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी नोंदणी करण्यात येणार असून, यासाठी शुल्कही शिवभक्तच भरणार आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर