ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

वृंदावनच्या सप्ताहासाठी 317 भाविक मथुरेकडे

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अधिकमास हा हिंदू धर्मात पुरुषोत्तम मास म्हणून अत्यंत पवित्र मानला जातो. या पावन महिन्यात केलेल्या जप, तप, दान, तीर्थाटन आणि विशेषतः श्रीमद् भागवत कथेच्या श्रवणाने मानवाला जन्मोजन्मीचे पुण्य लाभते, असे प्रतिपादन येथील खासदार अनुप धोत्रे यांनी केले. श्री क्षेत्र वृंदावन धाम (मथुरा) येथील यमुना नदीच्या तीरावरील ज्ञानबाग, मोतीझील येथील श्री व्यंकटेश्वर आश्रम येथे ३ ते १० जून दरम्यान भव्य श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. अकोला जिल्हा व परिसरातील ३१७ भाविक गंगानगर-नांदेड-अमृतस र एक्सप्रेसने मथुरेकडे रवाना झाले. अकोला रेल्वे स्थानकावर भाजप महानगर शाखेच्या वतीने महानगराध्यक्ष जयंत मसने यांच्या अध्यक्षतेखाली या यात्रेकरू भाविकांचा भव्य सत्कार करत निरोप देण्यात आला. याप्रसंगी खासदार अनुप धोत्रे व मान्यवरांच्या हस्ते सर्व भाविकांना श्रीफळ, शाल, औषधी किट, मोफत नाश्ता व महाप्रसाद देण्यात आला. या १२ दिवसांच्या संपूर्ण प्रवासात भाविकांना केवळ भागवत कथेचा लाभच मिळणार नाही, तर गोकुळ, बरसाना, नंदगाव, गोवर्धन परिक्रमा, आग्रा येथील ताजमहाल, लाल किल्ला आणि वृंदावनचे प्रसिद्ध प्रेम मंदिर अशा ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचे दर्शन घडवणार आहेत. यजमान, मुख्य कार्यक्रम या सोहळ्याचे मुख्य आयोजक अवधुत महाराज थोरवे असून, कथेचे यजमानपद रोहणा येथील गजेंद्र महाराज पांडे व प्रतिभाताई पांडे भूषवीत आहेत. अकोल्याच्या सुप्रसिद्ध कथावाचक ह.भ.प. लताताई विठ्ठलराव इंगळे (पिंप्री बझार) या आपल्या रसाळ वाणीतून भागवत कथेचे अमृतपान करून देणार आहेत. या सोहळ्याला गुरुवर्य अशोक महाराज जायले, एकनाथ महाराज पवार, ज्ञानेश्वर महाराज जाधव आणि खोले गुरुजी यांचे विशेष सानिध्य लाभणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर