ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

नितेश राणेंचा मास्टरस्ट्रोक? कोकणात राजकीय भूकंप; ठाकरे गटाच्या उमेदवाराची माघार:NCP चे अनिकेत तटकरेंचा मार्ग मोकळा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी कोकण विभागात मोठी राजकीय घडामोड घडली. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने संपूर्ण निवडणुकीचे चित्र बदलले आहे. विशेष म्हणजे अर्ज मागे घेण्यापूर्वी बाळ माने हे भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यासोबत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. या वेळी त्यांनी संख्याबळ नसल्याने आपण माघार घेत असल्याचे प्रसाद माध्यमांशी बोलताना सांगितीले. या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून कोकणातील विधान परिषद निवडणूक आता बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सुरुवातीपासूनच चुरशीची लढत अपेक्षित मानली जात होती. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने बाळ माने यांना रिंगणात उतरवले होते. दोन्ही बाजूंनी मतदारांशी संपर्क आणि निवडणुकीची तयारी सुरू होती. त्यामुळे या मतदारसंघात थेट सामना रंगेल, असे चित्र होते. मात्र, अंतिम क्षणी बाळ माने यांनी घेतलेल्या निर्णयामुळे ही निवडणूक प्रत्यक्ष मतदानापूर्वीच एकतर्फी झाली आहे. अर्ज मागे घेतल्यानंतर कोकणातील विधान परिषद निवडणुकीत केवळ अनिकेत तटकरे हेच प्रमुख उमेदवार उरले आहेत. त्यामुळे त्यांच्या बिनविरोध निवडीची प्रक्रिया जवळपास निश्चित मानली जात आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या नाट्यमय घडामोडीमुळे महायुतीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे, तर महाविकास आघाडीत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात घडलेल्या या बदलामुळे कोकणातील राजकीय समीकरणांवरही चर्चा सुरू झाली आहे. बाळ माने यांचा राजकीय प्रवासही चर्चेचा विषय ठरत आहे. ते यापूर्वी भाजपमध्ये सक्रिय होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी मंत्री उदय सामंत यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर ठाकरे गटाने त्यांच्यावर विश्वास दाखवत विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली होती. मात्र निवडणुकीच्या निर्णायक टप्प्यावर त्यांनी अर्ज मागे घेतल्याने राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे. महायुतीचे वर्चस्व स्पष्ट कोकण विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ पाहिले तर महायुतीचे वर्चस्व स्पष्ट दिसून येते. या मतदारसंघातील एकूण 831 मतदारांपैकी शिवसेना शिंदे गटाकडे 236 सदस्यांचे संख्याबळ आहे. भाजपकडे 151, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 63 सदस्य आहेत. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडे 55, तर काँग्रेसकडे 50 सदस्य आहेत. या संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर महायुतीची बाजू आधीपासूनच मजबूत मानली जात होती. आता बाळ माने यांच्या माघारीनंतर अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असून कोकणातील विधान परिषद निवडणूक मतदानाशिवायच निकालाच्या दिशेने गेली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर