ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

नसरापूर प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय; 28 दिवसांत आरोप निश्चित:आता रोज सुनावणी; निर्घृण कृत्यानंतर न्यायालय कठोर

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात घडलेल्या नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात न्यायालयाने मोठा निर्णय घेत आरोपीविरोधात अवघ्या 28 दिवसांत आरोप निश्चित केले आहेत. या गंभीर प्रकरणाची आता फास्टट्रॅक पद्धतीने सुनावणी होणार असून रोज ‘इन कॅमेरा’ पद्धतीने खटला चालवला जाणार आहे. न्यायालयाने आरोपीविरोधात प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे निरीक्षण नोंदवल्याने या प्रकरणाला आता निर्णायक वळण मिळालं आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं असताना न्यायव्यवस्थेने घेतलेल्या वेगवान भूमिकेचं स्वागत केलं जात आहे. या प्रकरणातील आरोपीला पहिल्यांदाच प्रत्यक्ष न्यायालयात हजर करण्यात आलं. सुनावणीदरम्यान आरोपीच्या वकिलांकडून आरोप निश्चितीला विरोध करण्यात आला. मात्र तपास यंत्रणेकडून सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीविरोधात आरोप निश्चित केले. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 15 दिवसांत दोषारोपपत्र दाखल केलं होतं. त्यानंतर लैंगिक तपासणी अहवाल, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर महत्त्वाचे पुरावे न्यायालयासमोर मांडण्यात आले. त्याची पडताळणी झाल्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी रोज घेण्याचा निर्णय दिला. 1 मे रोजी नसरापूर येथे ही धक्कादायक घटना घडली होती. घरासमोर खेळत असलेल्या चिमुकलीला आरोपीने गोठ्यात नेलं आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर दगडाने तिची हत्या करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवण्यात आला होता. दुपारपासून मुलगी दिसत नसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर गोठ्यात तिचा मृतदेह आढळून आला आणि परिसरात मोठी खळबळ उडाली. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपी चिमुकलीला गोठ्याकडे नेताना दिसल्याने संपूर्ण प्रकार उघड झाला. या घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली होती. आरोपीने चिमुकलीला वासरू दाखवतो असं सांगत हात धरून गोठ्यात नेल्याची माहिती समोर आली. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आजीकडे आलेल्या या मुलीसोबत असा प्रकार घडल्याने कुटुंबीय पूर्णपणे हादरले आहे. दुपारी साडेतीन वाजताच्या सीसीटीव्ही फुटेजने संपूर्ण गाव सुन्न झालं. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांना घेराव घालत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली होती. अखेर ग्रामस्थांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. धक्कादायक बाब म्हणजे इतकं गंभीर कृत्य केल्यानंतरही आरोपीने न्यायालयात आपण काही चुकीचं केलं नसल्याचा दावा केला. न्यायाधीशांनी त्याला प्रकरणाची माहिती विचारली असता, ही मारामारीची किरकोळ केस आहे,ए असं उत्तर त्याने दिल्याचं समोर आलं. आरोपीच्या या वक्तव्यामुळे न्यायालयात उपस्थित सर्वांमध्ये संताप व्यक्त झाला. पोलिस तपासात आरोपीविरोधात यापूर्वीही अशाच प्रकारच्या दोन प्रकरणांची माहिती समोर आली आहे. मात्र पुरावे अभावी तो निर्दोष सुटल्याचंही सांगितलं जात आहे. रोज होणाऱ्या ‘इन कॅमेरा’ सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष नसरापूर प्रकरणामुळे राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. चिमुकलीला न्याय मिळावा आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. न्यायालयाने या प्रकरणाची जलदगतीने सुनावणी सुरू केल्याने पीडित कुटुंबाला काहीसा दिलासा मिळाला आहे. आता रोज होणाऱ्या ‘इन कॅमेरा’ सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असून या प्रकरणात कठोर निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर