ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

चंद्रपूर नगरपरिषद निवडणूक निकाल:काँग्रेसचे वर्चस्व, मात्र भद्रावतीत भाजपच्या वृषाली पांढरेंचा ‘एक’ मताने थरारक विजय

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


चंद्रपूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांच्या निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले असून, यात काँग्रेसने 7 जागांवर विजय मिळवत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली असली, तरी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलेली परखड मते आणि भद्रावतीमधील निकालाची जिल्ह्यात मोठी चर्चा होत आहे. जिल्ह्यात काँग्रेसने मुसंडी मारली असतानाच, भद्रावती नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजपच्या उमेदवार वृषाली पांढरे यांनी काँग्रेसच्या बलाढ्य फळीला धूळ चारत केवळ एका मताने विजय मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. भद्रावतीची ही निवडणूक काँग्रेससाठी प्रतिष्ठेची होती, कारण येथे विजय वडेट्टीवार यांच्यासह खासदार प्रतिभा धानोरकर यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, काँग्रेसच्या या तगड्या आव्हानासमोर भाजपच्या वृषाली पांढरे यांनी मिळवलेला विजय ऐतिहासिक मानला जात आहे. या विजयाचे मुख्य सूत्रधार त्यांचे पुतणे आणि भाचे शिवा पांढरे ठरले. अनेकांचा विरोध झुगारून शिवा यांनी आपल्या मावशीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आणि मित्रमंडळींच्या मदतीने राबवलेल्या अचूक नियोजनामुळे काँग्रेसच्या गडाला खिंडार पाडले. या विजयानंतर राजकीय वर्तुळात या ‘मावशी-भाच्याच्या’ जोडीची विशेष चर्चा होत आहे. भद्रावतीमध्ये राजकीय समीकरणे अत्यंत चुरशीची होती. येथे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही मोठ्या पक्षांना मागे टाकत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रफुल्ल चटकी नगराध्यक्षपदी निवडून आले. अशा कठीण परिस्थितीतही भाजपच्या वृषाली पांढरे आणि गीता सावनकर यांनी आपल्या जागा निवडून आणत पक्षाची प्रतिष्ठा जपली आहे. आपल्या या यशाचे श्रेय वृषाली पांढरे यांनी पती विनोद पांढरे यांचा खंबीर पाठिंबा, शिवा पांढरे यांची मेहनत आणि प्रभागातील महिला व सहकाऱ्यांना दिले आहे. काँग्रेसच्या लाटेत केवळ एका मताने मिळवलेला हा विजय भाजपसाठी अत्यंत मोलाचा ठरला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर