ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

इराण Vs इस्त्रायल – अमेरिका युद्धाच्या महाराष्ट्राला झळा:व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद; सरकारचे घरगुती गॅस पुरवठ्याला प्राधान्य

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आखाती युद्धामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून, पुण्यात व्यावसायिक सिलेंडरचे वाटप थांबवण्यात आले आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या वाटपाला सध्या प्राधान्य दिले जाणार आहे. वितरकांना शुक्रवारी सकाळपासून व्यावसायिक सिलेंडरच्या नवीन ऑर्डर न घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एचपीसीएल (HPCL) आणि बीपीसीएल (BPCL) या प्रमुख गॅस वितरण कंपन्यांनी त्यांच्या वितरकांना चाकण आणि शिरूर येथील प्लांटमधून या सूचना दिल्या आहेत. ५, १९, ३५, ४७ आणि ४२७ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलेंडरच्या ऑर्डर सध्या थांबवण्यात आल्या आहेत. पुढील सूचना मिळेपर्यंत वितरकांनी व्यावसायिक गॅससाठी वाहने पाठवू नयेत, असेही सांगण्यात आले आहे. सिलेंडरचे वाटप काही दिवसांसाठी थांबवण्याचा निर्णय या निर्णयामुळे हॉटेल आणि उद्योग क्षेत्रावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. आखाती युद्धामुळे गॅस वितरणावर परिणाम झाला असून, गॅसचा पुरवठा मर्यादित झाला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या वाटपात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी व्यावसायिक सिलेंडरचे वाटप काही दिवसांसाठी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीत गेलेले ट्रक गॅस न भरताच परत पाठवण्यात आले याबाबत गॅस वितरण वितरक जीवन अल्हाट यांनी माहिती दिली की, औद्योगिक वापराचे व्यावसायिक सिलेंडर कंपनी भरणार नाही, केवळ घरगुती सिलेंडर भरले जातील असे त्यांना सांगण्यात आले आहे. सिलेंडर भरण्यासाठी चाकण येथील गॅस कंपनीत गेलेले ट्रक गॅस न भरताच परत पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या शिल्लक असलेल्या साठ्यानंतर व्यावसायिक गॅस वाटपास अडचण निर्माण होईल. औद्योगिक वापराच्या सिलेंडर वाटपावर बंदी आल्याने आगामी काळात त्याचा परिणाम सर्वसामान्यांनाही जाणवेल, असे अल्हाट यांनी नमूद केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर