ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

‘पांढऱ्या पट्ट्यांवरून’ राजकारण करणाऱ्यांना मते मिळत नाहीत:मुख्यमंत्री फडणवीसांचा मनसेला टोला; गिरगावात कार्यकर्त्यांची धरपकड

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जैन धर्मगुरू आणि साध्वींच्या सोयीसाठी मुंबईतील विविध रस्त्यांवर मारण्यात आलेल्या ‘पांढऱ्या पट्ट्यांवरून’ आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दादर पाठोपाठ आता गिरगाव आणि घाटकोपरमध्येही मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत पट्ट्यांवर काळा रंग फासण्यास सुरुवात केली आहे. या वाढत्या वादावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच स्पष्ट शब्दांत भाष्य केले असून, “प्रत्येक गोष्टीला वादात ओढून राजकारण केल्याने कधीच मते मिळत नाहीत,” असा सणसणीत टोला त्यांनी मनसेला लगावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील वर्सोवा ते भाईंदर नॉर्थ कोस्टल रोडची पाहणी केली. यावेळी माध्यमांशी संवाद साधला असता, सदर वादावर आपली भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “कोणत्याही राजकीय फायद्यासाठी दोन समाजांना एकमेकांसमोर उभे करणे आणि त्यांच्यात तेढ निर्माण करणे पूर्णपणे चुकीचे आहे.” “एखाद्या समाजाची एखादी परंपरा असेल, तर ती परंपरा त्यांनी सांभाळली पाहिजे आणि इतर समाजानेही त्यांच्या परंपरेचा आदर राखला पाहिजे. त्याचप्रमाणे, ज्यांची ती परंपरा आहे, त्यांनी इतर समाजाला त्रास होणार नाही याची काळजी घेत त्यांचा आदर केला पाहिजे. आपल्या संस्कृतीत एकमेकांचा आदर करणे हेच सर्वांत महत्त्वाचे आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. चर्चेत राहण्यासाठी सुरू असलेल्या स्टंटला उत्तर देणार नाही मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दादरमध्ये घेतलेल्या आक्रमक भूमिकेवर नाव न घेता निशाणा साधताना फडणवीस म्हणाले, “विनाकारण प्रत्येक गोष्टीला वादात ढकलून त्यामध्ये राजकारण ओतल्याने कुणाचाही फायदा होत नाही, आणि त्यातून कधीच मतेही मिळत नाहीत. अनेक जण केवळ चर्चेत राहण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. त्यांच्या अशा प्रत्येक गोष्टीला मी बोललंच पाहिजे आणि प्रतिक्रिया दिलीच पाहिजे, असे अजिबात नाही.” नेमका वाद काय? जैन समाजातील धर्मगुरू आणि साध्वी नेहमी अनवाणी पायांनी पायी प्रवास करतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने डांबरी रस्त्यावरून चालताना त्यांच्या पायाला चटके बसून त्रास होऊ नये, यासाठी घाटकोपर, दादर आणि दक्षिण मुंबईतील रस्त्यांवर या पांढऱ्या पट्ट्या रंगवण्यात आल्याचा दावा जैन समाजातील काही सदस्यांनी केला आहे. घाटकोपर-विद्याविहार परिसरातील कैलास अव्हेन्यू सोसायटीमध्ये जैन धर्मगुरूंच्या आगमनासाठी रंगवलेल्या पांढऱ्या पट्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या वादाला तोंड फुटले. गिरगावात मनसे आक्रमक; कार्यकर्त्यांना पोलिसांचा अटकाव काल दादरमध्ये मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आक्रमक पवित्रा घेत पालिकेला या पट्ट्या पुसण्यास भाग पाडले होते. त्यानंतर आज गिरगावमध्येही हा वाद उफाळून आला. गिरगावमधील मनसे विभाग अध्यक्ष दिनेश पुंडे यांनी रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्यांवर थेट काळा रंग मारून निषेध नोंदवला. या आंदोलनाची माहिती मिळताच गावदेवी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मनसे आणि ‘आम्ही गिरगावकर’ संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर