ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

हिंगोलीत खते-बियाणे लिंकिंग रोखण्यासाठी अधिकाऱ्यांची विशेष पथके तैनात:खतांसोबत इतर उत्पादनांची सक्ती केल्यास थेट तक्रार करण्याचे आवाहन

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली जिल्ह्यात आगामी खरीप हंगामात बियाणे व खतांचे लिंकींग रोखण्यासाठी पाच तालुक्यांसाठी दहा अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे. शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्यास तातडीने कृषी केंद्रावर जाऊन शाहनिशा केली जाणारआहे. तक्रारीत तथ्य आढळून आल्यास कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यात पेरणीपूर्व मशागत पूर्ण झाली असून आता शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे. पाऊस झाल्यानंतर पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. यावर्षी सुमारे ३.८० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कृषी निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची तसेच कृषी निविष्ठा विक्रेत्यांची बैठक घेऊन आवश्‍यक त्या सुचना दिल्या आहेत. तसेच कृषी विभागानेही बैठका घेऊन खतासोबत इतर कोणत्याही उत्पादनांची किंवा निविष्ठांची सक्तीने विक्री करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. विक्रेत्यांकडून बळजबरीने इतर उत्पादने देण्याचा प्रयत्न होत असल्यास शेतकऱ्यांनी त्यास नकार द्यावा. कृषी निविष्ठांची लिंकींग होत असल्यास तातडीने तक्रार करावी असे आवाहन कच्छवे यांनी केले आहे. दरम्यान, सध्या खते बियाणांची खरेदी सुरु झाली असून त्यासाठी कृषी विभागाने गुणनियंत्रण विभाग सज्ज केला आहे. लिंकींग बाबत शेतकऱ्यांना तक्रारी करणे सोईचे व्हावे यासाठी पाच तालुक्यांमधून १० अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. या अधिकऱ्यांकडे करा तक्रार यामध्ये हिंगोली तालुक्यासाठी कृषी अधिकारी प्रविण मनवर पंकज राठोड यांची नियुक्ती केली आहे. कळमनुरी तालुक्यासाठी समीर वाळके, रामेश्वर गवळी, वसमत तालुक्यासाठी केशव भुक्तरे, रामेश्वर गवळी. सेनगाव तालुक्यासाठी देवेंद्र देशमुख, पंकज राठोड. औंढा नागनाथ तालुक्यासाठी किशोर शेळके व सुभाष पाचपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर