ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

जय पवारांना 10 कोटींचे ‘कर्ज’ नाही तर ‘ॲडव्हान्स’ दिला:बंगला खरेदीसाठी मागील वर्षी केलेला व्यवहार, विक्रम काकडेंचा खुलासा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी महायुतीची उमेदवारी मिळाल्यापासून चर्चेत असलेले विक्रम काकडे आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. काकडे यांनी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांना १० कोटी रुपयांचे कर्ज दिल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. मात्र, “ते कर्ज नसून बंगला खरेदी करण्यासाठी दिलेली आगाऊ रक्कम आहे,” असा महत्त्वपूर्ण खुलासा खुद्द विक्रम काकडे यांनी केला आहे. विक्रम काकडे यांच्या संपत्तीच्या विवरणपत्रात जय पवार यांच्या नावावर १० कोटी रुपये दाखवण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. यावर स्पष्टीकरण देताना काकडे म्हणाले की, “मी जय पवार यांना कोणतेही कर्ज दिलेले नाही. प्रतिज्ञापत्रात ‘लोन्स अँड ॲडव्हान्सेस’ असा उल्लेख आहे. तो व्यवहार एका मालमत्ते संदर्भात आहे. माझे सध्याचे घर यशवंत गाडगे नगरमधील बंगला क्रमांक ९ आहे आणि त्या शेजारील १० क्रमांकाचा बंगला जय पवार यांच्या नावावर आहे. तो प्लॉट मला स्वतःला राहण्यासाठी खरेदी करायचा असल्याने हा व्यवहार झाला आहे.” हा व्यवहार मागील वर्षीच झाला असून त्याचा सध्याच्या निवडणुकीशी कोणताही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्याकडे हा बंगला घेण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर, तो जय पवार यांच्या मालकीचा असल्याने त्यांच्यासोबत हा व्यवहार करून ही आगाऊ रक्कम दिल्याचे विक्रम काकडे यांनी सांगितले. सुनील टिंगरेंची नाराजी अन् बंडखोरीवर भाष्य पुणे विधान परिषदेसाठी माजी आमदार सुनील टिंगरे इच्छुक होते, मात्र त्यांना डावलून काकडेंना उमेदवारी मिळाल्याने पक्षात नाराजी असल्याच्या चर्चा होत्या. यावर बोलताना काकडे म्हणाले, “निवडणुकीची घोषणा झाल्यावर जोपर्यंत अधिकृत उमेदवार घोषित होत नाही, तोपर्यंत काही प्रमाणात सगळे लोक उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. पण एकदा उमेदवार जाहीर झाला की, पक्षांतर्गत असलेली सगळी नाराजी संपून जाते. तरी सुद्धा जे इच्छुक उमेदवार होते, त्यांच्या सगळ्यांची मी काल भेट घेतली. सगळ्यांशी बोलताना त्यातील कुणी नाराज असल्याचे मला वाटले नाही.” माझे वडील शरद पवारांना विनंती करतील निवडणुकीच्या गणितावर भाष्य करताना विक्रम काकडे यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, “महाविकास आघाडीने जर माघार घेतली नाही, तर तशीही आम्ही निवडणुकीची तयारी केलेली आहे. मताधिक्य आमच्याकडे बऱ्यापैकी जास्त आहे. जवळपास ९५ टक्के मते ही महायुतीची आहेत. मी महायुती अधिकृत उमेदवार असल्यामुळे ती सर्व मते मला पडतील, अशी खात्री आहे. एक टक्काही मत इकडे तिकडे जातील, असे मला वाटत नाही. महाविकास आघाडीने या निवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना माझे वडील विनंती करतील.” अपक्ष उमेदवारही माघार घेतील संजय कंद आणि प्रदीप कणसे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. दोघांनीही नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ते माघार घेतील का? याबाबत विक्रम काकडे यांनी विचारले असता ते म्हणाले, संजय कंत हे माघार घेतील, असा विश्वास विक्रम काकडे यांनी व्यक्त केला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर