ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

किरकोळ कारणावरून दोघांना भोसकले:उपचारासाठी नांदेडला हलवले, मारेकऱ्यांचा शोध सुरू; वसमत शहरातील थरार

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


वसमत येथील शहरपेठ भागात किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर दोघांना खंजीरने भोसकल्याची घटना शनिवारी ता. २७ रात्री घडली आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविले आहे. या प्रकरणी वसमत पोलिसांनी तातडीने मारेकऱ्यांचा शोध सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत शहरातील शहरपेठ भागात नारायण सर्जेराजे हा त्याची दुचाकी घेऊन गेला होता. यावेळी दुचाकी आणण्याच्या कारणावरून त्याचा त्याच भागातील दोघांसोबत वाद झाला. त्यानंतर नारायण याने त्याचा मित्र गणेश गायकवाड व अन्य एकास बोलावून घेतले. त्यामुळे वाद वाढतच गेला. शाब्दिक चकमकीनंतर हाणामारी सुरु झाली. यामध्ये दोघांनी नारायण व गणेश यांच्या पोटात तसेच पाठीवर खंजीरने वार केले तसेच अन्य एकाच्या डोक्यातही वार केले. यामध्ये गणेश व नारायण गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वसमत पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधीर वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक खंदारे, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार गजानन भोपे, दिनेश म्हात्रे, अजय पंडीत, इमरान कादरी, सुरेश जाधव, गुहाडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस येत असल्याचे लक्षात येताच मारहाण करणाच्या दोघांनी पळ काढला. दरम्यान, घटनास्थळी गणेश व नारायण जागीच कोसळले होते शिवाय रस्त्यावर रक्ताचा सडाच पडला होता. पोलिसांनी जखमी दोघांनाही तातडीने उपचारासाठी वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नसला तरी पोलिसांनी मारेकऱ्यांच्या शोध सुरु केला आहे. तर कायदा व सु्व्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी गस्त वाढवली आहे. हे ही वाचा… भिंगी येथील तरुण अभियंत्याचा नागपूर येथे अपघाती मृत्यू:आठ महिन्यापुर्वीच नागपूर मनपाचा झाला होता रूजू, गाववर शोककळा हिंगोली तालुक्यातील भिंगी येथील तरुण अभियंत्याचा नागपूर येथे अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी ता. २७ सकाळी मृतदेहावर नागपूर येथील रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. मयत अभियंता तेजस निमदेव (२५) हा आठ महिन्यापुर्वीच अभियंता नागपूर मनपाच रुजू झाला होता. या घटनेमुळे निमदेव कुटूुंबासह गावावर शोककळा पसरली आहे. सविस्तर वाचा…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर