ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

तहसीलदार राकेश गिड्डेंच्या मृत्यूनंतर सरकारचा मोठा दिलासा:पत्नीला सांगलीत अनुकंपा नोकरी; फडणवीस सरकारचा तातडीचा निर्णय

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बीड जिल्ह्यातील केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाती निधनानंतर राज्य सरकारने त्यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. दिवंगत तहसीलदारांच्या पत्नी नेहा गिड्डे यांना अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत सामावून घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहानुभूतीपूर्वक हा निर्णय घेतल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे अवघ्या दीड महिन्याच्या आत सरकारने ही प्रक्रिया पूर्ण करत कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे. या निर्णयामुळे प्रशासकीय वर्तुळात समाधान व्यक्त होत आहे. राकेश गिड्डे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी नेहा गिड्डे यांनी सरकारकडे अनुकंपा तत्वावर नोकरीची मागणी केली होती. त्यांनी बीडऐवजी सांगली जिल्ह्यात नियुक्ती मिळावी अशी विनंती प्रशासनाकडे केली होती. त्यांच्या या मागणीचा विचार करत शासनाने विशेष बाब म्हणून सांगली येथेच नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील अधिकृत पत्र पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाला पाठवण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गिड्डे कुटुंबाला मोठा मानसिक आधार मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान, 9 एप्रिल रोजी लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ भीषण अपघात झाला होता. सकाळच्या सुमारास राकेश गिड्डे स्वतःच्या कारने प्रवास करत असताना त्यांच्या वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की राकेश गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले होते. अपघातग्रस्त वाहनातून त्यांचा मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी राकेश गिड्डे कारमध्ये एकटेच होते. पहाटेच्या सुमारास वेगात असताना अचानक गाडीवरील ताबा सुटल्याने वाहन उलटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक घटनास्थळी धावून आले, मात्र तोपर्यंत गिड्डे यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे महसूल विभागासह संपूर्ण बीड जिल्ह्यावर शोककळा पसरली होती. अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण राकेश गिड्डे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने वेगाने हालचाली करत नेहा गिड्डे यांना शासकीय सेवेत संधी देण्याचा निर्णय घेतला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मानवी दृष्टिकोन ठेवून हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. राज्य सरकारच्या या भूमिकेमुळे प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, संकटाच्या काळात शासन कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिल्याची भावना व्यक्त होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर