ब्रेकिंग न्यूज
⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ…
SP News Maregaon

मी हाय तुझ्या पाठीशी, म्हावरं काप बिनधास्त:मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मासळी बाजारातील कोळी भगिनींना केले आश्वस्त

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


वाकोला येथील मासळी बाजारात मासे कापण्यावर महानगरपालिकेने कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. त्यामुळे वाकोला सह मुंबईतील सर्व मासळी बाजारांमधील कोळी भगिनींनी आणि बांधवांनी निर्धास्तपणे आपला व्यवसाय करावा. त्यांच्या पाठीशी मुंबईची महापौर म्हणून मी स्वतः खंबीरपणे उभी आहे. “मी हाय तुझ्या पाठीशी, म्हावरं काप बिनधास्त”, अशा शब्दात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मासळी व्यावसायिकांना आश्वस्त केले आहे. वाकोला येथील मासळी बाजारात मासे कापण्यास महानगरपालिकेच्या स्थानिक प्रशासनाकडून मनाई केल्याचा कथित आरोप करणारे वृत्त विविध प्रसारमाध्यम आणि समाजमाध्यमातून प्रसारित झाले आहे. या अनुषंगाने मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आज (दिनांक ७ मे २०२६) सकाळी वाकोला मासळी बाजारात प्रत्यक्ष भेट देऊन कोळी भगिनींची भेट घेतली. मासे कापण्यावर महानगरपालिकेने कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. कोळी भगिनी आणि बांधवांनी निर्धास्तपणे आपला व्यवसाय करावा. मुंबईचे मूळ नागरिक म्हणून कोळी समाजाची ओळख आहे. त्यांच्या पाठीशी मुंबईची महापौर म्हणून मी स्वतः आणि संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. मासे कापण्याच्या अनुषंगाने ज्या काही बातम्या पसरवल्या गेल्या, तो अपप्रचाराचा भाग आहे. त्याला कोणीही बळी पडू नये, असे महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केले. मासळी व्यावसायिकांशी देखील संवाद यावेळी स्थानिक मासळी व्यावसायिकांशी देखील महापौरांनी संवाद साधला. आपल्याला कोणीही रोखले नसल्याचे आणि कुणीही त्रास देत नसल्याचे देखील या कोळी भगिनींनी स्पष्ट केले. जर कोणी रोखण्याचा प्रयत्न केला तर थेट माझ्याशी संपर्क करावा, सर्व अडचणींचे निराकरण मी स्वतः करीन, असे महापौरांनी या कोळी भगिनींना आश्वासन दिले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर